आर्थिक

Government Saving Scheme: ‘या’ आहेत सर्वोत्तम परतावा देणाऱ्या सरकारी बचत योजना! वाचा कोणत्या योजनेत मिळतो किती व्याजदर?

Published by
Ajay Patil

Government Saving Scheme:- चांगल्यात चांगला परतावा मिळणे व गुंतवणूक केलेला पैसा सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून जर आपण उपलब्ध असलेल्या गुंतवणूक योजनांचा विचार केला तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

परंतु यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य हे बँक मुदत ठेव योजना यांना प्रामुख्याने दिले जाते. याशिवाय म्युच्युअल फंड एसआयपी आणि ज्यांना जोखीम पत्करण्याची तयारी असेल असे गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात.

याशिवाय सध्या रियल इस्टेट मधील गुंतवणुकीकडे देखील मोठ्या प्रमाणावर ट्रेंड वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच नॅशनल सेविंग सर्टिफिकेट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात सीनियर सिटीजन सेविंग स्कीम, पोस्ट ऑफिस मुदत योजना तसेच पीपीएफ यासारख्या सरकारी योजना देखील गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

अनेक गुंतवणूकदार या सरकारी योजनांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात. जर आपण या सरकारी योजनांचा विचार केला तर मिळणारा उच्च परतावा आणि गुंतवणुकीचे सुरक्षितता या दृष्टिकोनातून खूप फायद्याच्या आहेत. त्यामुळे या लेखामध्ये कोणत्या सरकारी गुंतवणूक योजनेमध्ये किती व्याज मिळते व तुमच्यासाठी गुंतवणुकीसाठी कोणती योजना चांगली राहील हे आपण जाणून घेऊ.

 कोणत्या सरकारी योजनांवर किती मिळते व्याज?

1- स्मॉल सेविंग स्कीम अर्थात लहान बचत योजना- नियमितपणे बचत करण्यासाठी अल्पबचत योजना नागरिकांसाठी खूप महत्त्वाच्या असून अल्प बचत योजनांमध्ये एक ते तीन वर्षाची ठेव योजना, पाच वर्षाची आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिट स्कीम,

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र,किसान विकास पत्र यासारख्या बचत प्रमाणपत्र देखील यामध्ये समाविष्ट आहेत. तसेच काही सामाजिक सुरक्षा योजना जर पाहिल्या तर यामध्ये पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी,

सुकन्या समृद्धी आणि जेष्ठ नागरिक बचत योजना यादेखील महत्त्वाच्या योजना आहेत. सरकारी लहान बचत योजनांवर सरकारच्या माध्यमातून चार टक्के ते 8.2% व्याज दिले जाते.

 अल्पबचत योजनांवर मिळणारे व्याज

1- बचत खाते यामध्ये चार टक्के इतके व्याज मिळते.

2-  पोस्ट ऑफिस मुदत ठेव अर्थात एफडी यामध्ये 6.9 टक्के इतका व्याजदर मिळतो.

3- दोन वर्षाची पोस्ट ऑफिस एफडी यावर सात टक्के इतका व्याजदर मिळतो.

4- तीन वर्षाची पोस्ट ऑफिस एफडी यावर सात टक्के इतका व्याजदर मिळतो.

5- पाच वर्षे पोस्ट ऑफिस एफडी यावर 7.5 टक्के इतका व्याजदर मिळतो.

6- पाच वर्ष रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी या योजनेत 6.5% इतका व्याजदर मिळतो.

7- एनएससी अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यावर 7.7 टक्के इतका व्याजदर मिळतो.

8- किसान विकास पत्र या योजनेत 7.5% इतका व्याजदर मिळतो. ( मॅच्युरिटी पिरियड 115 महिने)

9- पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यामध्ये 7.1% इतका व्याजदर मिळतो.

10- सुकन्या समृद्धी योजना या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 8.2% इतका व्याजदर मिळतो.

11- ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 8.2% इतका व्याजदर मिळतो.

12- मासिक उत्पन्न योजना या योजनेत 7.4% इतका व्याजदर मिळतो.

Ajay Patil