आर्थिक

Income Tax Saving Tips: ‘या’ टिप्स वापरा आणि इन्कम टॅक्स वाचवा! नाही कापला जाणार फेब्रुवारी-मार्च महिन्याचा पगार

Published by
Ajay Patil

Income Tax Saving Tips:- 31 मार्च 2024 ला चालू आर्थिक वर्ष संपेल म्हणजेच आता आर्थिक वर्ष संपायला थोडे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये जे काही करदाते असतात त्यांची लगबग सुरू असते.

त्याकरिता जे काही महत्त्वाचे आर्थिक नियोजन असते ते देखील बऱ्याच जणांकडून सुरू केले जाते. यामध्ये जर तुम्ही देखील करदाते असाल व अजून पर्यंत तुम्ही कर बचतीची कुठलीही योजना बनवली नसेल तर ती योजना बनवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

याकरिता तुम्ही जो काही कष्टाने पैसा कमावतात व तो कोणत्या ठिकाणी गुंतवायचा या विचारात जर तुम्ही असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये आपण कर वाचवण्यासाठी महत्त्वाचे असे काही उत्तम पर्याय पाहणार आहोत.

यामध्ये तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत काही योजनांमध्ये गुंतवणूक केली तर आयटीआर भरताना कर कपातीचा दावा करू शकतात. त्या नेमक्या कोणत्या योजना आहेत? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.

 या योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि कर वाचवा

1- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा एक महत्त्वाचा पर्याय असून एक लोकप्रिय करबचत योजना म्हणून देखील ओळखली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर 7.1% दराने व्याज मिळते.

तुम्ही जर या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वार्षिक दीड लाख रुपयाच्या गुंतवणूक वर करसूट मिळणे शक्य आहे. तसेच या योजनेत गुंतवणूक केल्यावर गुंतवणुकीवर सरकारची हमी देखील असते. या योजनेचा लॉक इन पिरेड जवळपास पंधरा वर्षांचा आहे.

2- नॅशनल पेन्शन सिस्टम- ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना असून यामध्ये देखील गुंतवणूक केली तर कर सूट मिळते व ती आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत मिळत असते. याशिवाय तुम्ही कलम 80CCD(1B) अंतर्गत वार्षिक दीड लाख रुपये आणि अतिरिक्त पन्नास हजार रुपये देखील तुम्ही गुंतवू

शकतात. या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही दोन लाख रुपयांची सूट मिळवू शकतात. दरमहा तुम्ही एक हजार रुपये गुंतवणूक करून देखील या योजनेची सुरुवात करू शकतात. एनपीएस योजनेचे खाते तुम्ही कोणत्याही बँकेत उघडू शकतात.

3- ज्येष्ठ नागरिक बचत योजना- ही देखील एक लोकप्रिय अशी बचत योजना असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडावे लागते.

यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यावर खात्यात जी काही रक्कम जमा होते त्यावर 80C अंतर्गत आयकर सूट मिळवणे शक्य आहे. या योजनेत तुम्ही कमाल दीड लाख रुपये एका वर्षात गुंतवू शकतात. या योजनेवर 8.2% इतके व्याज दिले जाते.

4- सुकन्या समृद्धी योजना- मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजने मध्ये खाते उघडून कर बचत करू शकतात.

योजनेमध्ये तुम्ही कमाल दीड लाख रुपये एका वर्षात जमा करून आयकर सूट मिळवू शकतात. या योजनेत गुंतवणुकीवर 8.2% व्याज मिळते. तसेच चांगल्या प्रकारे परतावा देखील मिळतो.

5- ईएलएसएस इक्विटी फंड- इक्विटी  लिंक्ड सेविंग स्कीम अर्थात ईएलएसएस हा एक इक्विटी फंड असून हा एकमेव असा म्युच्युअल फंड आहे ज्यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत कर सवलत मिळू शकते.

एवढेच नाही तर यामध्ये वार्षिक एक लाख रुपयांपर्यंतचा परतावा किंवा नफ्यावर कुठल्याही प्रकारचा कर लागत नाही. यामध्ये तीन वर्षाचा सर्वात कमी लॉक इन पिरेड आहे व तो सर्व कर बचत गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे.

Ajay Patil