Public Provident Fund : हा आहे गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय, व्याजदरासह जाणून घ्या फायदे..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Public Provident Fund : आपल्या भविष्याचा विचार करून आपण अनेकदा गुंतवणुकीचा विचार करत असतो. अनेकदा मुलांचे शिक्षण लग्न किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला पैसे बचत करायचे असतात. जर तुम्ही सुद्धा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या याबद्दल.

दरम्यान, या योजनेअंतर्गत सध्या ७.१% इतका वार्षिक व्याजदर दिला जातो तर यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता.

दरम्यान, हे खाते तुम्ही फक्त 500 रुपये देऊन उघडू शकता. तर या खात्यामध्ये दरवर्षी किमान 500 रुपये ठेव आवश्यक आहे, तर या खात्यामध्ये तुम्ही कमीत कमी 500 तर जास्तीच जास्त 1.5 लाख इतके पैसे ठेवू शकता.

PPF खाते हे १५ वर्षांत मॅच्युअर होत असल्यामुळे तुम्ही पूर्ण मॅच्युरिटीनंतर आपले सर्व पैसे काढू शकता.

यासोबतच जर तुम्हाला पैशांची गरज नसेल तर प्रत्येकी 5 वर्षांसाठी तुम्ही मुदतवाढ करू शकता. यासाठी मुदतपूर्तीच्या एक वर्ष आधी तुम्ही ही पॉलिसी वाढवून घेऊ शकता.

दरम्यान, जर तुम्हाला या योजनेद्वारे 1 कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल, तर तुम्ही 25 वर्षे प्रत्येक महिन्याला 12,500 रुपये गुंतवणूक करवी लागणार आहे. तसेच जर तुम्ही दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 25 वर्षांनंतर अंदाजे 81.76 लाख रुपये मिळतील.

PPF खाते कोण उघडू शकते?

दरम्यान, हे खाते कोणतीही व्यक्ती कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वतःच्या नावाने हे खाते उघडू शकते. याशिवाय, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने खाते इतर कोणतीही व्यक्ती उघडू शकते.