India’s Richest Beggar : तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे याची कल्पना आहे का ? कदाचित तुम्हाला या प्रश्नातच काहीतरी गफलत झाली असावी असा प्रश्न पडला असेल. मात्र तुम्ही वाचत असलेला प्रश्न एकदम बरोबर आहे. भारतात असाही एक भिकारी आहे जो की खूपच श्रीमंत आहे.
या भिकाऱ्याकडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. राहण्यासाठी करोडो रुपयांचे घर आहे. त्याची मुले कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे या भिकाऱ्याचा स्वतःचा बिजनेस देखील आहे. मात्र असे असतानाही आजही हा भिकारी आपल्या राजधानीत अर्थातच राजधानी मुंबईत भिक मागतो. कदाचित या साऱ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे.
ही गोष्ट आहे देशाच्या आर्थिक राजधानीतल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या भिकाऱ्याची. ही गोष्ट आहे राजधानी मुंबईतल्या भरत जैनची. मीडिया रिपोर्ट नुसार, भरत जैन नावाचा व्यक्ती मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानात भिक मागतो.
मात्र या भरत नावाच्या भिकाऱ्याकडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. जिथे सर्वसामान्यांना मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये आशियाना खरेदी करता येणे सुद्धा आव्हानात्मक वाटत आहे तिथे भरत जैन यांनी करोडो रुपयांचे फ्लॅट खरेदी केले आहेत. मुंबई आणि पुण्यात भरत जैन याचे फ्लॅट आहेत. एवढेच नाही तर त्यांनी काही दुकानेही खरेदी केली आहेत.
तो सध्या त्याच्या एक कोटी वीस लाख रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहतो. त्याची मुले कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे भीक मागून त्याने स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे. मात्र करोडो रुपयांची प्रॉपर्टी, स्वतःचा बिजनेस, राहण्यासाठी करोडो रुपयांचे घर एवढं सारं असतानाही आजही भरत जैन भीक मागतो हे विशेष. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलं भाऊ आणि वडील आहेत.
त्याच्या परिवारातील सदस्यांनी त्याला भीक मागू नये म्हणून मनाई केली आहे. मात्र तरीही तो भिक मागणे सोडत नाही. भीक मागून भरत जैन दिवसाला 2500 रुपयांपर्यंतची कमाई करतो. म्हणजेच महिन्याला 75 हजार रुपयांपर्यंतची कमाई त्याला होते. अशा तऱ्हेने तो वर्षाकाठी 9 लाख रुपयांपर्यंतची कमाई भिक मागून करत आहे. एका अंदाजानुसार त्याच्याकडे सध्या स्थितीला 8.50 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
यामध्ये भिक मागून जमवलेल्या आणि बिजनेस मधून प्राप्त झालेल्या पैशांचा देखील समावेश आहे. असं म्हणतात की, भरत जैन याचा फ्लॅट परळ भागात आहे. परळ भागात त्याने टू बीएचके फ्लॅट खरेदी केला असून तो या फ्लॅटमध्येच राहतो. तसेच ठाण्यात त्याने दोन दुकान खरेदी केले असून या दुकानाचे त्याला महिन्याला 50 हजार रुपये एवढे भाडे मिळते.
एवढेच नाही तर पुण्यातील घरही त्याने भाड्याने दिले आहे. शिवाय त्याचा परिवार एक स्टेशनरी दुकान चालवते. यामुळे भरत जैन हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत भिकारी म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे असलेली ही करोडो रुपयांची संपत्ती त्याला सर्वाधिक श्रीमंत भिकारी असल्याचा टॅग देते.