जेव्हा आपण एखाद्या विषारी प्राण्याचा विचार करतो, तेव्हा सापाचे नाव सहसा आपल्या डोक्यात येते. साप हा विषारी प्राणी आहे हे जरी खरे असले तरी आपल्या आजूबाजूला विषारी प्राणी जास्त आहेत आणि त्याचे विष सापाच्या विषापेक्षाअधिक घातक आणि विषारी असते.
नदीच्या किनाऱ्यावर, तलावावर किंवा झाडाझुडपांमध्ये आपण सर्वांना कधी ना कधी हा छोटासा जीव भेटतो. “विंचू” म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी पाहिल्यावर आपण भीतीने दूर जातो. या छोट्या प्राण्याला सामोरे जाण्याची जोखीम पत्करली तर तो आपल्याला ८५ कोटी रुपयांचा मालक बनवू शकतो. होय हे खरे आहे. पण कसे? आज आम्ही तुम्हाला या विषयावर महत्त्वाची माहिती देणार आहोत-
*छोट्या जीवामध्ये करोडपती बनण्याची क्षमता :- लहान दिसणारा पण आपल्या विषाने करोडपती बनू शकणारा जीव. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ज्याचे विष तुमचा जीव घेऊ शकते, अशा प्राण्याचे विष जर तुम्ही पकडले तर तुम्हाला कोट्यधीश होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
*1 लिटर विषाची किंमत 85 कोटी :- या प्राण्याच्या शोधात तुम्हाला दक्षिण आफ्रिका किंवा अमेझॉनच्या जंगलात जावे लागणार नाही, तर हे जीव तुमच्या घराभोवती किंवा परिसरात सापडतील. ‘विंचू’ म्हणून ओळखला जाणारा हा जीव चावला अन वेळेवर उपचार न झाल्यास तो हानिकारक ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात एक लिटर विंचू विषाची किंमत ८५ कोटींहून अधिक आहे.
*एका विंचवामध्ये दोन मिलीलीटर विष :- एका विंचवापासून 2 मिली पर्यंत विष काढले जाऊ शकते. आता या विषाची उपयुक्तता काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते एवढ्या मोठ्या किमतीला का विकले जाते, हा प्रश्न स्वाभाविक आहे.
खरं तर, अँटी-वेनम बनवण्याव्यतिरिक्त, ऑस्टियोआर्थरायटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि मायस्थेनिया ग्रॅव्हिस सारख्या रोगांच्या उपचारांमध्ये याचा वापर केला जातो. प्रयोगशाळेत पावडर स्वरूपात तयार केल्यानंतर ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते.