State Bank of India : देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी अनेक योजना राबवते. ज्याअंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. सध्या तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेत तुम्ही कोणतीही रिस्क न घेता तुमचे पैसे दुप्पट करू शकता. SBI कडून ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या मुदत ठेवींचा पर्याय मिळतो. बँकेकडून अगदी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD सुविधा पुरवली जाते.
SBI वेगवेगळ्या मॅच्युरिटी कालावधीसाठी FD वर वेगवेगळे व्याजदर देत आहे. बँक ग्राहकांना ३ टक्के ते ६.५ टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना बँक ३.५ टक्के ते ७.५ टक्के व्याजाचा लाभ देत आहे.
समजा तुम्ही 10 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी एसबीआयमध्ये एक लाख रुपये एकरकमी जमा केले तर तुमचे पैसे तुम्हाला दुप्पट होऊन मिळतील. SBI FD कॅल्क्युलेटरनुसार, गुंतवणूकदारांना 6.5 टक्के दराने 90,555 लाख रुपये व्याज मिळतील. 10 वर्षांनी मॅच्युरिटीवर गुंतवणूकदारांना 90,555 रुपये मिळतील.
याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्के दराने व्याज मिळत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी एफडी केली तर त्याचे पैसे आणखी वाढतील. जर जेष्ठ नागरिकाने 1 लाख रुपये 10 वर्षांच्या FD मध्ये गुंतवले तर मॅच्युरिटीवर 2,10,234 रुपये मिळतील. यामध्ये व्याजातूनच 1,10,234 रुपये कमाई होईल.