Share Market Tips : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे विकास निगम लिमिटेड म्हणजे RVNL च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. खरे तर या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना खूपच चांगला परतावा दिला आहे.
गेल्या चार वर्षांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 774 टक्के रिटर्न देण्याची किमया साधली आहे. यामुळे चार वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीवर विश्वास दाखवला असेल आणि गुंतवणूक केली असेल तर त्यांना आजच्या घडीला खूपच चांगला परतावा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक 47.67% आणि यावर्षी 151.93% एवढा वाढला आहे.
तसेच RVNL चे शेअर्स गेल्या एका वर्षात 141.88% वाढलेले आहेत. विशेष बाब अशी की, या शेअरने चार वर्षांत ७७४.४३% एवढा परतावा दिला आहे. चार वर्षांपूर्वी या कंपनीचे स्टॉक 19 रुपयांवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर ट्रेड करत होते. आता मात्र स्टॉकची किंमत ही 172.70 रुपयांवर पोहोचली आहे. काल अर्थातच 4 डिसेंबर 2023 रोजी या शेअर्समध्ये 5% एवढी वाढ झाली असून हा स्टॉक 172.50 रुपयांवर पोहचला आहे.
अशातच आता या कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीकडून सोमवारी सांगितले गेले की, विवेक कुमार गुप्ता यांची संचालक मंडळावर अर्धवेळ सरकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरव्हीएनएलने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत याबाबत असे म्हटले आहे की, त्यांची नियुक्ती ही तत्काळ प्रभावाने करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, भारताच्या राष्ट्रपतींनी विवेक कुमार गुप्ता, प्रधान कार्यकारी संचालक (गती शक्ती), रेल्वे बोर्ड, यांची RVNL बोर्डावर अर्धवेळ सरकारी संचालक म्हणून नियुक्तीला तत्काळ प्रभावाने मान्यता दिली आहे. RVNL, रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत, रेल्वे पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प विकसित, वित्तपुरवठा आणि कार्यान्वित करते.