Multibagger Stocks : सध्या छोटे शेअर्स मजबूत परतावा देत आहेत. तुम्ही देखील असाच एक शेअर शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज आम्ही अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे गेल्या काही वर्षात खिसे गरम केले आहेत.
आम्ही सध्या टेलिकॉम स्टॉक व्हॅलिअंट कम्युनिकेशन्स शेअरबद्दल बोलत आहोत, ज्याने मागील काही काळापासून चंगली कामगिरी केली आहे. सध्या हा शेअर अप्पर सर्किट वर आहे.
व्हॅलेंट कम्युनिकेशन्स हा अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे ज्याने भारतीय शेअर बाजारात जोरदार परतावा दिला आहे. व्हॅलेंट कम्युनिकेशन्सच्या शेअरची किंमत गेल्या सहा महिन्यांत 60 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचवेळी, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 175 टक्के परतावा दिला आहे.
हा मल्टीबॅगर टेलिकॉम स्टॉक मार्च 2020 मध्ये 15 प्रति शेअर पातळीच्या खाली घसरल्यानंतर पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहे आणि आता शेअरची किंमत सुमारे 463 आहे. त्याच वेळी, टक्केवारीनुसार त्यात 3,000 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
व्हॅलेंट कम्युनिकेशन्सच्या शेअरने ९ एप्रिल २०२४ रोजी ५०० रुपयांची पातळी गाठली होती. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात शेअरचा भाव १३७ रुपये होता. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे.
कंपनीचे बाजार भांडवल 352.65 कोटी रुपये आहे. ही मायक्रो कॅप श्रेणीची कंपनी आहे. मार्च 2020 मध्ये या स्टॉकमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याची रक्कम 31 लाख झाली असती.