Multibagger Stocks : आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअर बद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. आम्ही कोचीन शिपयार्ड या जहाज बांधणी कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. या शेअर एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे.
सोमवारी कोचीन शिपयार्डचा शेअर 8 टक्के पेक्षा जास्त वाढून 2100 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. मार्च 2024 च्या तिमाहीत कोचीन शिपयार्डने जोरदार नफा कमावला आहे. कोचीन शिपयार्डचा नफा जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत जवळपास 7 पटीने वाढला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 750 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचे शेअर्स 750 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. 29 मे 2023 रोजी कोचीन शिपयार्डचे शेअर्स 243.58 रुपये होते. 27 मे 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 2100 रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या 6 महिन्यांत कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये जवळपास 265 टक्के वाढ झाली आहे. 28 नोव्हेंबर 2023 रोजी जहाज कंपनीचे शेअर्स 566.30 रुपयांवर होते, जे 27 मे 2024 रोजी 2100 रुपयांवर पोहोचले. गेल्या एका महिन्यात कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये 55 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 234.52 रुपये आहे.
मार्च 2024 च्या तिमाहीत कोचीन शिपयार्डने जोरदार नफा कमावला आहे. कंपनीचा निव्वळ नफा 558.82 टक्क्यांनी वाढून 258.9 कोटी रुपये झाला आहे. कोचीन शिपयार्डला वर्षभरापूर्वी याच कालावधीत 39.3 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत कंपनीचा महसूल 114.33 टक्केने वाढून 1286 कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 600 कोटी होता. ऑपरेटिंग स्तरावर कंपनीचा EBITDA 288.3 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या बोर्डाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 2.25 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे.