9 रुपयाच्या ‘या’ स्टॉकने गेल्या एका वर्षात दिला 300% हून अधिकचा परतावा ! एका वर्षातच गुंतवणूकदार झाले लखपती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Multibagger Stock : शेअर बाजारात नेहमीच चढ-उतार पाहायला मिळते. बाजारातील ही चढ-उतार मात्र काही लोकांसाठी फायदेशीर ठरते तर काही लोकांना याचा फटका बसतो. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन आणि बाजाराचा योग्य अभ्यास करून गुंतवणूक करावी लागते. तज्ञ लोक सांगतात की शेअर बाजारात लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. मात्र काही शेअर्स हे अल्पकालावधीतच गुंतवणूकदारांना मालामाल बनवतात.

काही स्टॉक मधून गुंतवणूकदारांना अवघ्या एका वर्षाच्या काळातच लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. आज आपण शेअर बाजारातील अशाच एका स्टॉक विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षाच्या काळात 300 टक्क्यांहून अधिकचे रिटर्न दिले आहेत.

कोणता आहे तो स्टॉक

खरे तर, गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. विशेषता पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला तेव्हापासून शेअर बाजारातील तेजी कायम आहे. या तेजीमुळे शेअर बाजारातील काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

गेल्या एका वर्षाच्या काळात अनेक कमी किमतीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. युनिटेक या कंपनीचा देखील यामध्ये समावेश होतो. या कंपनीचा शेअर बाजारातील असा स्टॉक आहे ज्याने फक्त एका वर्षातच 416 टक्के रिटर्न दिले आहेत.

या स्टॉकने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एका लाखाचे पाच लाख रुपये बनवले आहेत. विशेष म्हणजे लॉन्ग टर्म मध्ये देखील हा स्टॉक चांगला परतावा देणारा ठरला आहे. पण या स्टॉकच्या किमतीत मोठी चढ-उतार देखील पाहायला मिळाली आहे. 1995 मध्ये या स्टॉकची किंमत 96 पैसे होती मात्र आज ती नऊ रुपये आणि 26 पैसे एवढी आहे.

म्हणजेच या कालावधीत या स्टॉकने 867% रिटर्न दिले आहेत. परंतु मध्यंतरी हा स्टॉक तब्बल 519 रुपयांवर देखील पोहोचला होता. याचा अर्थ या स्टॉक मध्ये मोठी चढ-उतार झाली आहे. दरम्यान युनिटेकच्या शेअरची किंमत एका आठवड्यात 21.43 टक्क्यांनी आणि 3 महिन्यांत 214.81 टक्क्यांनी वाढली आहे.

तसेच गेल्या 52 आठवड्यात युनिटेक शेअरची हाय लेव्हल 8.85 रुपये आणि लो लेव्हल 1.10 रुपये एवढी नमूद करण्यात आली आहे. याचाच अर्थ हा शेअर फक्त चांगलाच परतावा देतो असे नाही तर यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना लॉस देखील सहन करावा लागला आहे. यामुळे, या शेअरमध्ये गुंतवणूक करताना वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.