Business Success Story:- व्यवसाय उभारणे किंवा सध्या व्यवसायाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे व ही गरज ओळखून आता अनेक उच्चशिक्षित तरुण व्यवसायांकडे वळत आहेत. कारण सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वाढताना दिसून येते व बेरोजगारीवर जर मात करायची असेल तर आता छोट्या मोठ्या व्यवसाया शिवाय पर्याय नाही.
व्यवसायांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांची खूप मोठी यादी तयार होईल. परंतु त्यातल्या त्यात शेतीमालावर प्रक्रिया उद्योग श्रेणीतील जे काही व्यवसाय आहेत ते देखील खूप महत्त्वाचे असून अनेक तरुण आता या शेतीशी संबंधित असलेल्या व्यवसायांकडे वळले आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण उत्तराखंडमधील तीन मित्रांची यशोगाथा बघितली तर यांनी राजस्थानमध्ये कोल्ड प्रेस्ड ऑईल म्हणजेच मोहरीच्या तेलाचा व्यवसाय सुरू केला आहे.
सत्यम भंडारी, रोहित निधी आणि मोहित राणा या मित्रांनी 2021 मध्ये हार्ट इन हिल्सची सुरुवात केली व आज स्वतः तर पैसा मिळवत आहेत परंतु इतर शेतकऱ्यांना देखील आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
तीन मित्रांनी सुरू केला मोहरी तेलाचा व्यवसाय
या तीन मित्रांची जर यशोगाथा बघितली तर या तीनही मित्रांपैकी सत्यम हे उत्तराखंडचे रहिवासी आहेत व सत्यम यांनी त्यांचे मित्र रोहित नेगी आणि मोहित राणा यांच्यासोबत येऊन 2021 मध्ये हार्ट इन हिल्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. यामध्ये फोरका ब्रँडच्या नावाखाली कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवायला सुरुवात केली.
त्यांच्या या उद्योगाने 1200 मोहरी उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करायला सुरुवात केली असून आज या व्यवसायातून हे तीनही मित्र लाखो रुपयांची कमाई करत आहेत. त्यांचा हा फर्म शेतकऱ्यांसोबत काम करत असल्याने शेतकऱ्यांना देखील खूप मोठा फायदा होत आहे.
राजस्थान मधील तब्बल बाराशे मोहरी उत्पादक शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले असून हार्ट इन हिल्स च्या माध्यमातून मोहरी तेलाचे उत्पादन घेतले जाते व त्याची विक्री केली जाते. म्हणजे इतर मोठ्या ब्रँडला देखील त्यांची ही कंपनी मोहरीचे तेल पुरवते व एवढेच नाही तर ॲमेझॉन व जिओ मार्ट सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील त्यांची ही उत्पादने विकली जातात.
हार्ट इन हिल्स लिमिटेड दोन शेतकरी उत्पादक संस्थांसोबत काम करते. त्यातील दोन एफपीओ पैकी एक झाशी जवळ आहे व दुसऱ्या चंबळ खोऱ्यात असून झाशी जवळील एफपीओ मधून भुईमुगाची खरेदी होते व शेंगदाणा तेलावर प्रक्रिया करून विकले जाते.
तसेच राजस्थान मधील करौली जिल्ह्यातील चंबळ नदीजवळ मोहरी उत्पादक शेतकऱ्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शेती करतात व हा एक आदिवासी भाग आहे. या ठिकाणचे जे काही शेतकरी आहेत ते जंगलात राहतात व त्या ठिकाणी मोहरीची लागवड करतात.
किती आहे त्यांच्या या स्टार्टअपची उलाढाल?
हे तिघेजण शाळेपासूनचे मित्र होते व यातील रोहित आणि मोहित हा सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्यांनी नोकऱ्या सोडून सत्यम सोबत आले व हार्ट इन हिल्सची स्थापना केली. त्यांचा जर 2023-24 या वर्षाचा महसूल बघितला तर तो 60 लाख रुपये होता
व त्यावरून तो आता 2024-25 च्या पहिल्या दोन तीमाहित एक कोटी तीन लाखापर्यंत वाढण्याची त्यांना अपेक्षा आहे. तसेच 2024-25 च्या अखेरपर्यंत दोन कोटी पाच लाखापर्यंत महसूल पोहोचेल असा त्यांचा अंदाज आहे.