आर्थिक

या 6 गोष्टींची काळजी घ्या आणि बँकेकडून पटकन लोन मिळवा! जाणून फायद्याची गोष्ट

Published by
Ratnakar Ashok Patil

Tips For Loan:- लोन मिळवताना CIBIL स्कोर एक महत्त्वाचा घटक असतो. पण याशिवाय आणखी काही गोष्टी असतात ज्या लोन मिळवण्यासाठी अतिशय आवश्यक असतात. बऱ्यावेळा, ग्राहकांचा CIBIL स्कोर चांगला असला तरी काही इतर कारणांमुळे त्यांना लोन मंजूर होत नाही. त्यामुळे जर तुम्ही लोन घेण्याचा विचार करत असाल तर फक्त CIBIL स्कोरवर लक्ष केंद्रित करणं योग्य नाही. या लेखात आपण जाणून घेऊया की,CIBIL स्कोरसह कोणत्या इतर घटकांचा विचार केला जातो आणि कशामुळे लोन नाकारले जाते याची सविस्तर माहिती बघू.

सिबिल स्कोर व्यतिरिक्त बँक कर्ज देताना ‘या’ गोष्टी देखील पाहते

1- तुमचे वार्षिक उत्पन्न किंवा महिन्याचे उत्पन्न- सर्वप्रथम, लोन मिळवण्याच्या प्रक्रियेत बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या इन्कम प्रमाणपत्रावर देखील लक्ष ठेवतात. तुम्हाला जर लोन मिळवायचं असेल तर तुमची वार्षिक इनकम किंवा तुमचा व्यवसाय कसा चालतो याची सुसंगत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या पगाराच्या सर्टिफिकेटसह, आयकर रिटर्न, बँक स्टेटमेंट्स इत्यादी दाखवू शकता.

2- तुम्ही घेतलेल्या मागच्या कर्ज परतफेडीचा इतिहास- बँक किंवा वित्तीय संस्थांना तुमची कर्ज परतफेडीचा इतिहास देखील महत्त्वपूर्ण असतो. अनेक लोक लोन घेताना त्याची योग्य रीतीने परतफेड करत नाहीत.

यामुळे तुमचा क्रेडिट इतिहास खराब होऊ शकतो. जो खूप चांगला नसेल तर लोन घेण्यात अडचणी येऊ शकतात. तुमच्या कर्ज चुकतेपणावरून बँक किंवा संस्था तुमच्या भविष्यातील कर्ज परतफेडीचा अंदाज लावतात.

3- तुमच्यावर चालू म्हणजेच विद्यमान असलेला कर्जाचा बोजा- तुमचा एक्झिस्टिंग कर्ज लोड देखील एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या व्यक्तीकडे आधीच अनेक कर्जे आहेत त्यांना आणखी कर्ज देण्याची शक्यता कमी असते.

बँक किंवा वित्तीय संस्था विचार करत असते की, या व्यक्तीला आणखी कर्ज देऊन त्यांच्यावर अधिक कर्जाचा भार वाढवला जातो का? त्यामुळे लोन मिळवण्यासाठी तुमचा एक्झिस्टिंग कर्ज लोड कमी असावा लागतो.

4- तुम्ही कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतात?- तुमच्या व्यवसायाच्या प्रकारावर देखील काही प्रमाणात लोन मंजुरीवर परिणाम होतो. जर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करत असाल किंवा तुमचा व्यवसाय सुरूवातीच्या अवस्थेत असेल, तर बँक किंवा संस्था तुमच्यावर अधिक कडक विचार करतील. स्थिर आणि प्रौढ व्यवसाय असलेल्या व्यक्तीला लोन मिळवण्याची शक्यता अधिक असते.

5- कर्जासाठी अर्ज करण्याचा टाइमिंग किंवा वेळ- कधी कधी लोन अर्ज करण्याची वेळ देखील महत्त्वाची ठरते. काही वेळा बँक किंवा वित्तीय संस्था विशेष कर्ज योजना चालवतात, ज्यात कमी व्याज दर किंवा इतर फायदे असू शकतात. यासाठी, त्यावेळी अर्ज करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही काही बॅंक किंवा संस्थांच्या स्कीम्ससाठी विचार केला तर तुम्ही अधिक फायदे मिळवू शकता.

6- लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे- शेवटी कागदपत्रांची अचूकता देखील महत्त्वाची आहे. लोन अर्ज करताना सर्व कागदपत्रे पूर्ण आणि अचूक असावीत. जर तुम्ही काही महत्त्वाची माहिती लपवली किंवा कागदपत्रांमध्ये गडबड केली, तर त्याचा तुमच्या लोन अर्जावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

यावरून आपल्याला दिसून येते की,लोन मिळवण्यासाठी फक्त CIBIL स्कोरवर लक्ष देणे पुरेसे नाही. इन्कम प्रमाणपत्र, कर्ज चुकतेपण, एक्झिस्टिंग कर्ज लोड, व्यवसायाची स्थिती आणि कागदपत्रांची अचूकता अशा अनेक इतर गोष्टींचा विचार केला जातो. हे सर्व घटक समजून आणि योग्य तयारी करूनच तुम्ही तुमची लोन मिळवण्याची संधी वाढवू शकता.

Ratnakar Ashok Patil