Fixed Deposit : 7 ते 365 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप बँका, बघा यादी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit : बाजारात कितीही गुंतवणूक पर्याय उपलब्ध असले तरीही, एफडी हा नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो. अशातच जर तुम्ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या कमी कालावधीतही जास्त व्याजाचा लाभ देत आहेत.

आम्ही तुम्हाला कोणती बँक 7 दिवस ते 12 महिन्यांच्या FD वर सर्वाधिक व्याजाचा लाभ देत आहे हे सांगणार आहोत. या यादीत खाजगी बँकांपासून ते सर्वच बँकांचा समावेश आहे. चला तर मग एक एक करून या बँकांबद्दल जाणून घेऊया…

HDFC बँक

एचडीएफसी बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 3 टक्के ते 6.00 टक्के दरम्यान व्याज सुविधा देत आहे.

ICICI बँक

ICICI बँक सामान्य नागरिकांसाठी 7 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 3 टक्के ते 6.00 टक्के दरम्यान व्याजदर देते आहे.

येस बँक

खाजगी क्षेत्रातील येस बँक सामान्य नागरिकांना 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3.25 टक्के ते 7.25 टक्के दरम्यान व्याज देत आहे.

SBI बँक

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI सामान्य नागरिकांना 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3 टक्के ते 5.75 टक्के दरम्यान व्याज देत आहे.

PNB बँक

पंजाब नॅशनल बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3 टक्के ते 7 टक्के दरम्यान व्याजाचा लाभ देत आहे.

कॅनरा बँक

कॅनरा बँक 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 4 टक्के ते 6.85 टक्के दरम्यान व्याज देत आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 4.50 टक्के ते 7.85 टक्के पर्यंत व्याज सुविधा देत आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3 टक्के ते 8.50 टक्के पर्यंत व्याज देत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 4 टक्के ते 6.85 टक्के व्याज देत आहे.