आर्थिक

Top SIP Return : ‘या’ 5 स्मॉल कॅप फंडांनी 5 वर्षांत केले करोडपती; 1 वर्षात मिळतोय 31 ते 42 टक्के परतावा !

Published by
Sonali Shelar

Top- 5 SIP Small Cap Funds : किरकोळ गुंतवणूकदार सध्या बाजारात भरपूर पैसे गुंतवत आहेत. म्युच्युअल फंडांमध्ये विशेषतः इक्विटी योजनांमध्ये त्यांची आक्रमक खरेदी सुरू आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमधील एक श्रेणी म्हणजे स्मॉल कॅप फंड. यामध्ये गुंतवणूकदार विक्रमी खरेदी करताना दिसत आहेत. स्मॉल कॅप फंडांमध्ये ऑगस्टमध्ये सलग पाचव्या महिन्यात विक्रमी वाढ दिसून झाली. या श्रेणीत 4265 कोटी रुपयांचा ओघ आला आहे. स्मॉल कॅप फंडातील टॉप 5 योजनांच्या SIP रिटर्नवर नजर टाकल्यास, गुंतवणूकदारांना 31-42 टक्के वार्षिक परतावा मिळत आहे.

टॉप-5 स्मॉल कॅप फंड एसआयपी रिटर्न

क्वांट स्मॉल कॅप फंड

क्वांट स्मॉल कॅप फंडाचा गेल्या 5 वर्षांत सरासरी SIP परतावा 42.69 टक्के प्रतिवर्ष आहे. या योजनेतील मासिक 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 वर्षांत 16.82 लाख रुपये झाले. या योजनेत किमान गुंतवणूक 5000 रुपये आहे. तर किमान एसआयपी 1000 रुपये आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाचा गेल्या 5 वर्षांतील सरासरी SIP परतावा वार्षिक 35.8 टक्के आहे. या योजनेतील मासिक 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 वर्षांत 14.35 लाख रुपये झाले. या योजनेत किमान गुंतवणूक 5000 रुपये आहे. तर किमान एसआयपी 1000 रुपये आहे.

एचएसबीसी स्मॉल कॅप फंड

5 वर्षात HSBC स्मॉल कॅप फंडाचा सरासरी SIP परतावा 31.82 टक्के प्रतिवर्ष आहे. या योजनेतील मासिक 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 वर्षांत 13.08 लाख रुपये झाले. या योजनेत किमान गुंतवणूक 5000 रुपये आहे. तर किमान एसआयपी 1000 रुपये आहे.

एचडीएफसी स्मॉल कॅप फंड

एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाचा 5 वर्षांत सरासरी SIP परतावा 31.16 टक्के प्रतिवर्ष आहे. या योजनेतील मासिक 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 वर्षांत 12.88 लाख रुपये झाले. या योजनेत किमान गुंतवणूक 100 रुपये आहे. तर किमान एसआयपी 100 रुपये आहे.

युनियन स्मॉल कॅप फंड

युनियन स्मॉल कॅप फंडाचा 5 वर्षांत सरासरी SIP परतावा 30.41 टक्के प्रतिवर्ष आहे. या योजनेतील मासिक 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 वर्षांत 12.65 लाख रुपये झाले. या योजनेत किमान गुंतवणूक रु 1,000 आहे. तर किमान एसआयपी 1,000 रुपये आहे.

स्मॉल कॅप फंड काय आहे ?

स्मॉल कॅप फंड स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. स्मॉल कॅप कंपन्यांचे मार्केट कॅप कमी असते. कंपन्यांचे मार्केट कॅप 500 कोटी रुपयांपेक्षा कमी असते. साधारणपणे, स्मॉल कॅप फंड मार्केट कॅपमध्ये 251 व्या क्रमांकापासून सुरू होणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. कंपन्यांच्या व्यवसायात पुढे वेगाने वाढ होण्याची अपेक्षा असते. फंड हाऊसेस त्यांच्या वाढीच्या मूल्यांकनाच्या आधारे गुंतवणुकीसाठी कंपन्यांना ओळखतात.

Sonali Shelar