Categories: आर्थिक

वीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटीकडे आहे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला पबजी खेळण्याचे चॅलेंज देत भारताचा लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी उर्फ अजय नागर मध्यंतरी चर्चेत आला.

सध्या त्याचे सोशल मीडियावर 32.75 मिलियन म्हणजे 3 कोटी 27 लाखाहून जास्त चाहते आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार कॅरी मिनाटीकडे जवळपास 27 कोटींची संपत्ती आहे.

कॅरी मिनाटीचे युट्यूबवर दोन चॅनेल्स आहेत. एकाचे नाव कॅरीमिनाटी आहे तर दुसऱ्याचे नाव कॅरी इज लाइव्ह असे आहे. कॅरी मिनाटी चॅनेलवर 19.4 मिलियन सबस्क्रायबर आहेत.

तर कॅरी इज लाइव्हवर 15 मिलियन सबस्क्रायबर आहेत. कॅरी मिनाटीचे इंस्टाग्रामवर 6.7 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. ट्विटरवर ही संख्या 15 लाख आहे.

अशापद्धतीने कॅरी मिनाटीच्या चाहत्यांची एकूण संख्या 32.75 मिलियन म्हणजे 3 कोटी 27 लाखाहून जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कॅरी मिनाटीकडे जवळपास 27 कोटींची संपत्ती आहे.

कॅरीला बालपणापासून व्हिडिओ गेम खेळण्याचा छंद होता आणि त्यामध्येच करियर केले. कॅरी मिनाटीने 30 ऑक्टोबर 2014ला युट्यूबवर गेमिंग चॅनेल अॅडिक्शन ए 1सुरू केले.

या चॅनेलवर तो काउंटर स्ट्राइक खेळत होता आणि सनी देओल व ऋतिक रोशनच्या आवाजात कमेंट्री करायचा. महिन्याभरात त्याने 150 व्हिडिओ बनविले.

हा खेळ जास्त भारतात सुपरहिट ठरला नाही. त्यानंतर कॅरीने चॅनेलचे नाव कॅरी देओल केले. त्यानंतर कॅरी मिनाटी रोस्टिंग करू लागला.

अजय नागर पहिला भारतीय युट्यूबर आहे ज्याने रोस्टिंग कंटेटची सुरूवात केली होती. नंतर त्याने चॅनेलचे नाव बदलून कॅरी मिनाटी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24