LIC Policy : एक काळ असा होता की मुलांच्या शिक्षणासाठी बाजारात कोणतीही विशेष योजना नव्हती, पण आता काळ बदलला आहे, सध्या बाजारात मुलांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये पैसे गुंतवून मोठा निधी तयार करत येतो.
अशातच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे, LIC ने नुकतीच लहान मुलांसाठी एक मोठा निधी तयार करणारी योजना लॉन्च केली आहे. ज्या अंतर्गत भरगोस व्याज दिला जात आहे.
आजच्या महागाईच्या युगात पालकांनी आपल्या मुलांसाठी आधीच पैसे साठवायला सुरुवात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने अशीच एक जबरदस्त योजना आणली आहे, जी खास मुलांसाठी तयार करण्यात आली आहे.
मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने, LIC ने आपली नवीन योजना अमृतबाल (Amritbaal) लाँच केली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून मुलांसाठी मोठ्या उत्पन्नाची व्यवस्था केली जाऊ शकते. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
LIC ने ही योजना Non Linked Non Participating Individual Saving Life Insurance Corporation म्हणून सुरू केली आहे. असे गुंतवणूकदार किंवा असे पालक ज्यांना आपल्या मुलांसाठी त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मोठा निधी उभारायचा आहे ते या योजनेत पैसे गुंतवू शकतात.
कोण खरेदी करू शकतो ?
-LIC ची अमृतबल पॉलिसी खरेदी करण्यासाठी, मुलाचे वय किमान 30 दिवस आणि कमाल 13 वर्षे असावे.
-या पॉलिसीच्या नियमांनुसार अमृतबलची मॅच्युरिटी किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
-या योजनेतील ठेव आणि गुंतवणुकीसाठी किमान विम्याची रक्कम 2,00,000 आहे, तर कमाल साठी कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही.
या अमृतबल योजनेत एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांना हमी परतावा देत आहे. अमृतबल खरेदी करताना प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी पॉलिसी सुरू झाल्यापासून पॉलिसीची मुदत संपेपर्यंत मूळ विमा रकमेच्या 80 रुपये प्रति हजार दराने हमी जोडणीद्वारे विमा रक्कम दिली जाते.