आर्थिक

Credit Card: युनियन बँकेने लॉन्च केले महिलांसाठी स्पेशल क्रेडिट कार्ड! महिलांना मिळतील भरपूर फायदे; कोणत्या महिलांना मिळेल हे क्रेडिट कार्ड?

Published by
Ajay Patil

Credit Card:- सध्या मोठ्या प्रमाणावर क्रेडिट कार्ड वापराचा ट्रेंड वाढताना दिसून येत असून कॉलेजच्या विद्यार्थ्यापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत व यासोबतच महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर क्रेडिट कार्डचा वापर सध्या करतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वाहनाला इंधन भरण्यापासून तर अनेक प्रकारचे खरेदी करणे सुलभ होते

व या माध्यमातून अनेक फायदे देखील संबंधित ग्राहकाला मिळत असतात. अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि ऑफर्ससह क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहेत.

अगदी याच पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची आणि प्रसिद्ध असलेली युनियन बँक ऑफ इंडियाने देखील आता ‘दिवा’ या नावाचे स्पेशल क्रेडिट कार्ड लॉन्च केले असून या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे हे कार्ड फक्त महिलांसाठी लॉन्च करण्यात आलेले आहे.

 युनियन बँकेच्यादिवाक्रेडिट कार्डचा लाभ कोणत्या महिलांना मिळेल?

युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेले दिवा क्रेडिट कार्ड फक्त महिला ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आलेले असून याकरिता 18 ते 70 या वयोगटातील महिला अर्ज करू शकणार आहात.

तसेच जर एखादी महिला पगारदार असेल तर अशी महिला क्रेडिट कार्डकरिता वयाच्या 65 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहेत.हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी उत्पन्नाची अट असून संबंधित महिला ग्राहकाचे दरवर्षी किमान उत्पन्न हे अडीच लाख रुपये असणे गरजेचे आहे.

 दिवा क्रेडिट कार्डचे महिलांना कोणते मिळतील फायदे?

इंडियन बँकेने खास महिलांसाठी सादर केलेल्या दिवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अर्बन क्लॅप, बुक माय शो, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, मंत्रा  व इतर महत्त्वाचे ब्रँडचे डिस्काउंट वाउचर ऑफर करते तसेच याशिवाय तुम्हाला या क्रेडिट कार्डवर एका वर्षात आठ कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंन्ज

आणि दोन कॉम्प्लिमेंटरी इंटरनॅशनल एअरपोर्ट लाऊंन्जची सुविधा देखील मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वार्षिक आरोग्य तपासणीची सुविधा देखील या क्रेडिट कार्डसह देण्यात येते.

जर वाहनांसाठी इंधन खरेदी करण्यासाठी या क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला एक टक्के इंधन अधिभाराची सूट मिळणार आहे. दिवा क्रेडिट कार्डवर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांकरिता तुम्हाला दोन रिवार्ड पॉईंट मिळतील.

 किती भरावी लागेल वार्षिक फी?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे युनियन बँक दिवा क्रेडिट कार्डसाठी सहभागी होण्यासाठीचे शुल्क शून्य रुपये आहे. परंतु तरीदेखील 499 रुपये वार्षिक शुल्क तुम्हाला भरणे गरजेचे आहे व यासोबत एका आर्थिक वर्षामध्ये 30000 रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला शंभर टक्के सूट मिळणार आहे.

Ajay Patil