Credit Card Rule:- भारतामध्ये सध्या जर आपण क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या पाहिली तर ती दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. किराणा मालाची खरेदी असो किंवा पेट्रोल पंपावर पेट्रोल/डिझेल भरणे असो व इतर खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
क्रेडिट कार्डचा वापर म्हणजे हे एक प्रकारचे हे बँकेकडून कर्ज घेऊन त्या कर्जाचा वापर करण्यासारखेच आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
नाहीतर क्रेडिट कार्डचा वापर हा जितका फायदा देणार आहे त्यापेक्षा जास्त नुकसान देणारा देखील ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर काही चुका करण्यापासून वाचणे खूप गरजेचे आहे. नाहीतर या चुका तुम्हाला अव्वाच्या सव्वा व्याज भरण्यास कारणीभूत ठरू शकतात.
क्रेडिट कार्डचा वापर करा परंतु या चुका टाळा
1- क्रेडिट कार्ड वरून रोख रक्कम काढू नका- आपल्याला माहित आहे की,ज्याप्रमाणे आपण एटीएम कार्डच्या मदतीने एटीएम मधून पैसे काढू शकतो. त्याच पद्धतीने क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकतात. क्रेडिट कार्डच्या मदतीने जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढले तर मात्र ते तुमच्यासाठी फायद्याचे नसून नुकसानदायक आहे.
या प्रकारे तुम्ही एटीएम मधून क्रेडिट कार्डचा वापर करून जर पैसे काढले तर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला 2.5 ते 3.5 टक्क्यांनी व्याज लागते. म्हणजे एकंदरीत आकडेवारी बघितली तर तुम्ही जे पैसे काढलेले आहे त्यावर वर्षाला 30 ते 42 टक्के दराने व्याज लागू शकते.
तुम्ही शॉपिंग करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला तर ते बिल भरण्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा वेळ दिला जातो.परंतु ड्यु डेट संपल्यावर तुम्हाला मात्र त्यावर व्याज भरावे लागते. तसेच रोख पैसे काढले तर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला व्याज भरावे लागते व त्यामुळे त्यामधून क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढू नये.
2- बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू नये- बऱ्याच क्रेडिट कार्डवर सध्या बॅलन्स ट्रान्सफर करण्याचा पर्याय दिला जातो. यामध्ये जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुम्ही या बॅलन्स ट्रान्सफर पर्यायाचा वापर करून एका कार्ड वरून दुसऱ्या कार्डचे बिल भरू शकतात.
परंतु ही सुविधा मोफत नाही. हा पर्याय जर वापरला तर बँक त्यावर शुल्क आकारते.आर्थिक दृष्टिकोनातून तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. काही इमर्जन्सी असेल तर बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय वापरू शकतात.
परंतु प्रत्येक वेळी हा पर्याय वापरणे चुकीचे आहे. तुम्ही जर बऱ्याचदा अशा पद्धतीने बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय वापरला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैसे भरावे लागू शकतात.
3- आंतरराष्ट्रीय व्यवहार करू नका- क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही विदेशात देखील करू शकतात. परंतु अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जर क्रेडिट कार्डचा वापर करून एखादे बिल पे केले तर तुम्हाला ट्रांजेक्शन शुल्क द्यावे लागते
व हे शुल्क कमी जास्त होत राहते. त्यामुळे या पर्यायाचा वापर केला तरी देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकते. विदेशात क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी तुम्ही प्रीपेड कार्डचा वापर केला तर ते फायद्याचे ठरते.