आर्थिक

पगार खात्यात जमा झाला की लगेच ‘हा’ फॉर्म्युला वापरा! पुढच्या महिन्याचा पगार येईपर्यंत नाही संपणार पैसे व होईल बचत

Published by
Ajay Patil

Money Saving Tips:- बरेच व्यक्ती किंवा तुम्हाला स्वतःला असा अनुभव आला असेल की जेव्हा पगार होते तेव्हा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो व पुढच्या महिन्याचा पगार येत नाही तोपर्यंत आपल्या बँकेच्या खात्यामध्ये एक रुपया देखील शिल्लक राहत नाही. तसेच बरेचजण पैशांची बचत व्हावी म्हणून प्रयत्न करत असतात.

परंतु तरीदेखील बचत करणे शक्य होत नाही व पैसा संपतो. या अनुषंगाने बचत नाही तर कुठे गुंतवणूक देखील करता येत नाही. या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असते ते आपले ढासळलेले आर्थिक नियोजन हे होय. म्हणजेच पैशाच्या बाबतीत या परिस्थितीला आपल्याच काही सवयी किंवा चुका कारणीभूत ठरतात.

या अनुषंगाने जर तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करून पैसा नेमका कुठे खर्च करावा? याबाबत जर नियोजन केले तर पैसा वाचतो व बचत करता येते व तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागत नाही. त्यामुळे आपण या लेखामध्ये असा एक सोपा फार्मूला बघणार आहोत त्याचा वापर केला तर महिन्याच्या पगारांमधून पैशाची बचत करणे शक्य होऊ शकते.

50:30:20 चा फार्मूला ठरेल फायद्याचा
हा फार्मूला किंवा पैसा खर्च करण्याच्या बाबतीतला हा नियम खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा जो काही पगार किंवा उत्पन्न आहे त्याची तीन भागांमध्ये विभागणी करावी लागते. ही विभागणी तुम्ही तुमच्या आवश्यक गरजांसाठीचा खर्च तसेच तुमच्या इच्छावर होणारा खर्च आणि बचत याबाबतीत हा खर्च करणे महत्त्वाचे ठरते.

यामध्ये जर तुम्ही बघितले तर भाडे, गृह कर्ज किंवा इतर कर्जांचे हप्ते,महिन्याला एखादा आरोग्य विमा किंवा जीवन/मुदत विम्याचा प्रीमियम असेल तर त्यासाठीचा लागणारा पैसा आणि किराणामाल इत्यादी आवश्यक गोष्टींवर तुम्ही पन्नास टक्के खर्च करणे गरजेचे आहे.

परंतु तुमच्या गरजांवर जर तुमच्या उत्पन्नापेक्षा 50% खर्च जास्त होत असेल तर तुम्ही तुमचा राहण्याचा खर्च कमी करून जास्त पैसे वाचवू शकतात. यामध्ये रेस्टॉरंट मध्ये जेवायला कमीत कमी वेळा जाणे तसेच लक्झरी वस्तूंवरील खर्च कमी करणे इत्यादी पर्यायाचा अवलंब करू शकतो. तसेच बऱ्याच व्यक्तींना आपली छंद जोपासणे किंवा बाहेर जेवायला जाणे,

एखादा सिनेमा पाहणे, ब्रॅण्डेड वस्तू किंवा गॅझेट खरेदी करणे यासारख्या गोष्टींची आवड असते. परंतु या भागातील खर्च खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. यासारखा खर्च आपल्या आवाक्याबाहेर जाणार नाही याकरिता तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या केवळ 30 टक्के खर्च यावर करावा.

या गोष्टींवर खर्च केल्यानंतर इमर्जन्सी मध्ये तुम्हाला कामी येतील याकरिता पैसा वाचवावा. जर अशी परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला खर्चाचा जास्त विचार करावा लागणार नाही व कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत.

यामध्ये तुम्ही 20% रक्कम एसआयपी मध्ये जमा करू शकता किंवा पॉलिसी खरेदी करू शकता किंवा आपत्कालीन निधी म्हणून गोळा करू शकतात.अशा प्रकारे प्रत्येक भागात तुम्ही तुमच्या पगाराची विभागणी केली तर कमीत कमी 20 टक्के रक्कम तुम्ही बचत करू शकतात.

Ajay Patil