EPFO Rule:- जेव्हा एखादा व्यक्ती सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असतो तेव्हा काम करत असताना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम पीएफ म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडाच्या उद्देशाने पगारातून कापली जाते व त्या व्यक्तीच्या ईपीएफ खात्यामध्ये ती जमा होत असते.
एवढेच नाही तर संबंधित व्यक्तीच्या पगारातून जितकी रक्कम कापली जाते तितकेच रक्कम नियोक्ताच्या माध्यमातून देखील संबंधित व्यक्तीच्या ईपीएफ खात्यात जमा केली जाते. अशाप्रकारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये कर्मचाऱ्यांचे पैसे जमा होत असतात व ही एक गुंतवणूक असते.
या ठिकाणी जमा झालेली रक्कम तुम्ही काही कालावधीनंतर काढू शकतात. परंतु यासंबंधी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे काही नियम देखील आहेत. या नियमांचे पालन करूनच तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यामधून पैसे काढता येणे शक्य आहे.
ईपीएफ खात्यांमधून तुम्ही काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा घरातील मुलांचे लग्न, एखादी वैद्यकीय इमर्जन्सी आली तेव्हा किंवा मुलांच्या शिक्षणासाठी, घराचे नूतनीकरण किंवा जमीन खरेदी करायची आहे तर अशा कामांकरिता तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकतात.
परंतु या बाबतीत जर महत्त्वाचा नियम पाहिला तर तुम्हाला ईपीएफओ सदस्यत्वाचे सात वर्षे पूर्ण झालेली असणे गरजेचे असते व तेव्हाच तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यामधून आडवांस रक्कम काढता येणे शक्य आहे. यामध्ये तुमची जितकी रक्कम जमा झालेली असते
त्या रकमेच्या जवळपास 50% ऍडव्हान्स रक्कम तुम्ही काढू शकतात. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ईपीएफ खात्यांमधून ऍडव्हान्स पैसे कसे काढता येतात किंवा त्याची प्रोसेस कशी असते? तर मग यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
ही सोपी पद्धत वापरा आणि पीएफ खात्यामधून ऍडव्हान्स पैसे काढा
1- पीएफ खात्यामधून ऍडव्हान्स पैसे काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला www.epfindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करावे लागेल. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर होम पेजवर ऑनलाईन ऍडव्हान्स क्लेमवर क्लिक करा व त्या ठिकाणी लॉगिन करणे गरजेचे राहील.
2- त्या ठिकाणी तुमचा युएएन नंबर आणि पासवर्ड टाकून पोर्टलवर साइन इन करावे लागेल.
3- त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस या टॅब वर क्लिक करावे. त्यानंतर ईपीएफ खात्यामधून आडवांस रक्कम काढण्यासाठी फॉर्मची निवड करावी व ड्रॉप डाऊन मेनू मधून क्लेम फॉर्म निवडावा.
4- दिलेल्या विंडोमध्ये तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार नंबर भरावे व त्यानंतर प्रोसेस फॉर ऑनलाईन क्लेम वर क्लिक करावे.
5- ड्रॉप डाऊन मधून पीएफ ऍडव्हान्स फॉर्म निवडावा व त्यानंतर पैसे काढण्याचे कारण लिहावे व किती पैसे काढायचे आहेत हे देखील नमूद करावे. त्यानंतर चेकची स्कॅन केलेली एक प्रत अपलोड करावी आणि तुमचा पत्ता लिहावा.
6- त्यानंतर गेट ओटीपी वर क्लिक करा आणि तुमच्या फोनवर आलेला ओटीपी त्या ठिकाणी टाकावा.
7- ही प्रोसेस केल्या गेल्यानंतर तुमचा क्लेम दाखल केला जातो आणि काही दिवसांनी क्लेमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात.