आर्थिक

महिन्याला पगारच पुरत नाही! नेमके काय करावे हे देखील सुचत नाही? वापरा ‘हा’ फार्मूला आणि वाचवा पैसे

Published by
Ajay Patil

बऱ्याच जणांना अनुभव येतो की, पगार झाल्यानंतर जोपर्यंत पुढच्या महिन्याची पगाराची तारीख येत नाही तोपर्यंत खात्यात एक रुपया देखील शिल्लक राहत नाही. त्यामुळे बचत करता येणे अशक्य होते व गुंतवणूक करणे तर लांबच राहते. त्यामुळे जर भविष्य काळामध्ये एखादी आर्थिक परिस्थिती उद्भवली तर मात्र मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

कारण तुम्ही बचत करू शकाल तरच गुंतवणूक करू शकाल  आणि गुंतवणूक कराल तरच भविष्य काळामध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक गरजांसाठी पैसा उभा करू शकाल. याकरिता तुम्हाला आहे त्या पैशांमध्ये नियोजन करणे खूप गरजेचे असते. तुम्हाला किती पगार आहे किंवा तुम्ही किती पैसे कमवतात?

याला महत्व नसून तुम्ही कमावलेल्या पैशाची बचत आणि नियोजन कसे करतात याला अतिशय महत्त्व असते. त्याकरिता आपण या लेखात पैसे वाचवण्यासाठी व गुंतवणूक करता यावी याकरिता 50-30-20 चा नियम वापरू शकतात. हा नियम वापरून तुम्ही आहे त्या पगारामध्ये पैसे वाचवून गुंतवणूक करू शकतात.

 सगळ्यात आधी तुमच्या पगाराची तीन भागात करा विभागणी

सगळ्यात आधी तुम्ही तुमचा जो काही पगार आहे त्याची तीन भागांमध्ये विभागणी करणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची गरज, इच्छा आणि बचत या गोष्टींचा समावेश होतो. आपण जर 50-30-20 चा नियम बघितला तर त्यानुसार उत्पन्नातील 50 टक्के भाग अशा गोष्टींवर खर्च करावा की ज्या आवश्यक आहेत.

यामध्ये तुमच्या घरातील किराणा तसेच भाडे, मुलांचे शिक्षण, घेतलेल्या कर्जाचा ईएमआय आणि आरोग्य विमा सारख्या महत्त्वाच्या गोष्टीवर तुम्ही 50 टक्के खर्च करू शकता. तसेच या नियमानुसार दुसरा भागात 30% चा असून 30 टक्के खर्च हा तुम्ही तुमच्या इच्छांवर खर्च करणे गरजेचे आहे.

परंतु इच्छा वरील खर्च टाळता येणे देखील शक्य आहे. अशा खर्चामध्ये पार्लरला जाणे किंवा सिनेमा पाहणे, हॉटेलिंग किंवा काही गोष्टींची खरेदी इत्यादीचा खर्चाचा समावेश होतो. हा 30% चा खर्च तुम्ही या गोष्टींवर करू शकतात किंवा हा खर्च तुम्ही टाळू देखील शकतात. तसेच या नियमातील तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे 20 टक्क्यांचा भाग होय.

पैशातील हा 20 टक्क्यांचा भाग तुम्ही बचतीसाठी ठेवणे गरजेचे आहे. ही बचत तुम्हाला मुलांचे शिक्षण तसेच निवृत्तीचे नियोजन, मुलांचे लग्नकार्य व एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक निधी करिता तुम्ही वापरू शकतात. 20 टक्के पैशांची बचत होणे गरजेचे आहे. त्यामुळे हा नियम जर वापरला तर तुम्ही आहेत त्या पगारात देखील चांगली बचत करू शकतात.

 उदाहरणाने समजून घेऊ हा नियम

समजा तुम्हाला जर पन्नास हजार रुपये महिन्याला पगार असेल तर तुम्ही हा नियम वापरताना 50000 मधून 25000 रुपये आवश्यक गोष्टींसाठी वापरावेत. नंतर तीस टक्के म्हणजेच पंधरा हजार रुपये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकतात. जसे की आपण पाहिले की इच्छेनुसार खर्चामध्ये प्रवास तसेच सिनेमा पाहणे,

कपडे किंवा इतर गोष्टींची खरेदी करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. नंतर त्यातून उरलेली 20 टक्के म्हणजेच दहा हजार रुपये तुम्ही वाचवणे गरजेचे आहे व या बचत केलेल्या दहा हजार रुपयांची गुंतवणूक तुम्ही एफडी किंवा म्युच्युअल फंडामध्ये करू शकता किंवा इतर गुंतवणुकीचे पर्याय देखील वापरून चांगला फंड जमा करू शकतात.

Ajay Patil