आर्थिक

Vi ने लाँच केला नवीन स्वस्तातला रिचार्ज प्लॅन ! 459 रुपयाच्या Recharge सोबत मिळणार 3 महिन्यांची व्हॅलिडिटी अन ‘हे’ फायदे

Published by
Ahmednagarlive24 Office

Vodafone Idea Recharge Plan : एकेकाळी आपल्या देशात वोडाफोन आणि आयडिया या दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्या होत्या. या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिध्वंदी होत्या. आता मात्र या दोन्ही कंपन्यांचे मर्जर झाले आहे. अर्थातच या दोन्ही कंपन्या आता एकत्रित आल्या असून Vi या नावाने या कंपनीला ओळखले जात आहे. यामुळे आता देशात Vi चा ग्राहक वर्ग खूपच मोठा तयार झाला आहे.

रिलायन्स जिओची बाजारात इंट्री झाल्यानंतर जरूर वोडाफोन आयडियाच्या ग्राहक वर्गात कमी पाहायला मिळाली आहे. पण आजही वोडाफोन आयडिया वापरणारे अनेक लोक पाहायला मिळतात. दरम्यान जर तुम्हीही वोडाफोन आयडियाचे कस्टमर असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे कंपनीने अलीकडेच एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्तातला रिचार्ज प्लॅन आहे.

वोडाफोन आयडिया कंपनीने 459 रुपयाचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनने रिचार्ज केल्यास तुम्हाला 84 दिवसांची म्हणजेच जवळपास तीन महिन्यांची व्हॅलिडीटी मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला 6 जीबी डेटा दिला जातो. हा डेटा तुम्ही तीन महिन्यांच्या काळात कधीही वापरू शकता. मात्र सहा जीबी डेटा संपल्यानंतर तुम्हाला डेटासाठी ऍड ऑन पॅक मारावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1000 हजार एसएमएस दिले जातात.

म्हणजे जर तुम्हाला अधिक Text Msg करावे लागत असतील तर आपल्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अनेक लोकांना आपल्या कामासाठी टेस्ट एसएमएस करावे लागतात. दिवसाला शेकडो लोकांना टेक्स्ट मेसेज केले जातात. जर तुमचेही असेच काही काम असेल तर तुमच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरेल. तसेच ज्या लोकांना जास्तीची व्हॅलिडीटी हवी असते अशा लोकांसाठी हा रिचार्ज प्लान फायदेशीर ठरू शकतो.

जर तुमचा इंटरनेटचा वापर कमी असेल किंवा तुम्ही इंटरनेटसाठी वायफाय घेतलेले असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र जर तुम्हाला दररोज मोठ्या प्रमाणात इंटरनेट बॅलन्स हवा असेल तर तुम्हाला दुसरा प्लॅनने रिचार्ज करावा लागेल आणि दुसरा प्लॅनच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हाला वोडाफोन आयडियाच्या या प्लॅन साठी रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही वोडाफोन आयडियाच्या अधिकृत एप्लीकेशन वरून रिचार्ज करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या जवळील रिटेलर कडे जाऊनही रिचार्ज करू शकणार आहात.

Ahmednagarlive24 Office