Categories: आर्थिक

नवीन वर्षात घर खरेदी करायचंय ? मग तुमच्यासाठी आहे ‘ही’ खुशखबर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- कोरोनाने 2020 ह्या वर्षात सर्वांचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता नवीन वर्ष लवकरच सुरु होतेय. गत वर्षात अनेकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न यामुळे मोडले असेल.

पण आता नव्या वर्षांत घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी. नवीन वर्षात घर खरेदीवरील स्टॅम्प ड्युटीचा भार बांधकाम व्यावसायिक उचलण्याची शक्यता आहे.

कारण तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे. यावर मंत्रीमंडळाने निर्णय घेतला, तर नवीन वर्षात स्टॅम्प डय़ुटी फ्री घर खरेदी करता येईल. तुमच्याऐवजी बिल्डर स्टॅम्प ड्युटी भरेल.

त्यानंतर बिल्डरला डेव्हलपमेंट प्रीमियममध्ये ५० टक्के सूट मिळेल, असा हा प्रस्ताव आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदार दोघांना फायदा होऊ शकतो.

तसेच घर खरेदी वाढल्यास राज्याचं अर्थचक्र गतीमान व्हायला मदत होईल. दिलासादायक बाब म्हणजे स्टॅम्प ड्युटीत ३१ डिसेंबरपर्यंत कपात केल्यानं मुंबई, पुण्यात घर खरेदीची नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढलीय. त्यामुळे त्याचा विचार करून सरकार ही नवी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24