Categories: आर्थिक

व्यवसाय करायचाय ? केळापासून सुरु करा ‘असे’ काही ; होईल खूप कमाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-तुम्हाला नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुम्हाला याठिकाणी एक खास आयडिया देणार आहोत. ज्यात तुम्ही चांगली कमाई करू शकाल. हा आहे केळ्यांच्या चिप्सचा व्यवसाय.

हे चिप्स तब्येतीला चांगले असतात. उपवासालाही लोक हे चिप्स खातात. बटाटा चिप्सपेक्षा केळ्याच्या चिप्सना जास्त मागणी आहे. म्हणून ते जास्त विकले जातात. या चिप्सचा मार्केट साइज छोटा आहे.

म्हणून शक्यतो ब्रँडेड कंपन्या या चिप्स बनवत नाहीत. म्हणूनच केळ्यांच्या चिप्सना जास्त मागणी आहे. अगदी सोप्या पद्धतीने या व्यवसायाला सुरूवात करून तुम्ही महिन्याला एका लाखांपर्यंत कमवू शकता.

हा व्यवसाय केळ्यांच्या चिप्सचा आहे. केळ्याचे चिप्स हे आरोग्यासाठीही चांगले असतात. इतकंच नाही तर उपवासालाही केळ्याचे चिप्स खाल्ले जातात. बटाट्याच्या चिप्सपेक्षा केळ्यांच्या चिप्सला जास्त मागणी आहे. त्यामुळे तुम्ही याचा उत्तम व्यवसाय सुरू करू शकता.

 या व्यवसायासाठी लागणारी उपकरणे

  • – केळ्यांना धुण्यासाठीचं टँक आणि केळे सोलण्याची मशीन
  • – केळ्यांना पातळ तुकड्यांमध्ये कापण्याची मशीन
  • – टुकड्यांना फ्राय करणारी मशीन
  • – मसाले लावण्याची मशीन
  • – पाऊच प्रिटिंग मशीन
  • – प्रयोगशाळा उपकरणं

किती येईल खर्च :- 50 किलो चिप्स बनवण्यासाठी कमीत कमी 120 किलो कच्च्या केळ्यांची गरज आहे. 120 किलो कच्ची केळी तुम्हाला जवळजवळ एक हजार रुपयांना मिळतील. याबरोबर 12 ते 15 लीटर तेलाची गरज लागते. 15 लीटर तेल 70 रुपयांच्या हिशेबानं 1050 रुपयांना पडेल. चिप्स फ्रायर मशीनला एक तासात 10 ते 11 लीटर डिझेल लागतं.

1 लीटर डिझेल 80 रुपयांच्या हिशेबानं 11 लीटर लागलं तर 900 रुपयांना पडेल. मीठ आणि मसाले जास्तीत जास्त 150 रुपयांना पडतील.

मग तुमचे 3200 रुपयांमध्ये 50 किलो चिप्स तयार होतील. म्हणजे एक किलोच्या चिप्सचं पाकीट 70 रुपयांना पडेल. तुम्ही आॅनलाइन किंवा किराणा दुकानात ते पाकीट 90 ते 100 रुपयांना विकू शकाल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24