Fixed Deposit : जेव्हा-जेव्हा लोक मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा ते साधारणपणे सर्वोच्च व्याजदर देणारी बँक शोधतात. ठेवीचा कालावधी जितका जास्त तितका व्याजदर जास्त. अल्प-मुदतीच्या बँक एफडी साधारणपणे 3 ते 4.5 टक्के दर वर्षी व्याजदर देतात. पण दीर्घकाळासाठी तुम्हाला व्याजदर 6 टक्क्यांपर्यंत वाढतो. आज आम्ही अशाच काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या दीर्घकाळासाठी सर्वाधिक परतावा देतात.
5 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप बँका!
ICICI बँक
बँक सामान्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी 7 टक्के व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळू शकते. हे दर 12 जुलै 2024 पासून लागू होतील.
HDFC बँक
बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 7 टक्के व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बेस पॉइंट्स जास्त व्याजदर प्रदान करते. हे दर 12 जून 2024 रोजी लागू होतील.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक त्यांच्या पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.2 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.7 टक्के व्याज देते. हे दर 14 जून 2024 रोजी लागू होतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक सामान्य नागरिकांना पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.5 टक्के दर देते, तर ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी 7.5 टक्के दर दिला जातो. हे व्याजदर 15 जून 2024 पासून लागू झाले आहेत.
पंजाब नॅशनल बँक
सार्वजनिक क्षेत्रातील बँक सामान्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी 6.5 टक्के दराने व्याज देते, तर ज्येष्ठ नागरिकांना 10 जून 2024 रोजी लागू होणाऱ्या व्याजदरानुसार 7 टक्के व्याज मिळू शकते.
बँक ऑफ बडोदा
सरकारी बँक BoB पाच वर्षांच्या ठेवींवर 6.5 टक्के व्याज देते, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.15 टक्के व्याज मिळते, असे बँकेची वेबसाइट दाखवते. हे दर 12 जून 2024 रोजी लागू होतील.