आर्थिक

Car Loan Interest Rate: ‘या’ दिवाळीला लोन घेऊन कार घ्यायची आहे का? 10 लाख रुपये लोनवर किती भरावा लागेल ईएमआय? वाचा बँकेचे व्याजदर

Published by
Ajay Patil

Car Loan Interest Rate:- सणासुदीच्या कालावधीमध्ये एखादे नवीन वाहन शुभ मुहूर्तावर खरेदी करण्याचा ट्रेंड हा गेल्या कित्येक वर्षापासून भारतात आहे. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात किंवा नवीन वाहनाची खरेदी करण्याचे प्रमाण हे सणासुदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाढते.

तसेच तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीमध्ये दिवाळी किंवा नवरात्रीमध्ये कर्ज घेऊन कार विकत घ्यायची असेल तर तुम्हाला कोणत्या बँकेच्या माध्यमातून वाहन कर्जावर किती व्याजदर आकारला जातो हे माहीत असणे तितकेच गरजेचे आहे.

यामध्ये वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून वेगवेगळे व्याजदर आकारला जातो. या लेखामध्ये आपण कोणती बँक वाहन कर्जावर सर्वात कमी व्याजदर आकारते? या बद्दलची माहिती घेऊ व दहा लाखाच्या कार लोनवर तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल? याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ.

 कोणत्या बँकेकडून वाहन लोनवर किती व्याजदर आकारला जातो?

1- स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून या बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही कार लोन घेतले तर बँक 8.75 टक्के दराने व्याज आकारते. जर तुम्ही दहा लाख रुपये नवीन कार घेण्यासाठी कर्ज घेतले तर तुम्हाला या बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा मासिक ईएमआय 24587 रुपये भरावा लागेल.

2- युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक असून या बँकेच्या माध्यमातून तुम्ही जर दहा लाख रुपयांचे कर्ज नवीन कार लोन घेतले तर या बँकेच्या माध्यमातून 8.70% व्याजदर आकारला जातो. हे कर्ज चार वर्षांसाठी आहे व त्यावर तुमचा ईएमआय 24 हजार 565 रुपये असेल.

3- बँक ऑफ बडोदा ही बँक देखील एक भारतातील महत्त्वाची बँक असून या बँकेच्या माध्यमातून तुम्ही चार वर्षाच्या कालावधीकरिता कार लोन घेतले तर 8.90% इतका व्याजदर बँक आकारते. यासाठी तुमचा ईएमआय 24655 रुपये असेल.

4- बँक ऑफ इंडिया ही देशातील महत्त्वाची असलेली बँक असून बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जर तुम्ही दहा लाख रुपये कार लोन घेतले तर बँकेच्या माध्यमातून यावर 8.85% टक्के व्याजदर आकारला जातो व दर महिन्याला 24 हजार 632 रुपये ईएमआय भरावा लागेल.

5- ॲक्सिस बँक ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही दहा लाख रुपये कार लोन घेतले तर या बँकेच्या माध्यमातून 9.30 टक्के दराने व्याज आकारले जाते व याकरिता ईएमआय 24 हजार 835 रुपये असेल.

6- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही दहा लाख रुपयांचे कार लोन घेतले तर यावर बँकेच्या माध्यमातून 9.40% दराने व्याज आकारले जाते. याकरिता तुम्हाला 24 हजार 881 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागतो.

7- आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही कार लोन घेतले तर 9.10% व्याज बँकेच्या माध्यमातून आकारले जाते दहा लाख रुपयांच्या कार लोनवर याचा मासिक ईएमआय 24745 रुपये असेल.

Ajay Patil