Categories: आर्थिक

PF अकाउंट मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या सोपी पद्धत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) मध्ये असलेल्या आपल्या PF अकाऊंटवरुन पैसे काढणाऱ्या खातेधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

दरम्यान तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात ती कंपनी आणि तुमच्या पगारातून विशिष्ट रक्कम दरमहा एकत्र साठवली जाते. दरम्यान ही रक्कम नोकरदार व्यक्तीला त्याच्या रिटायरमेंट नंतर लागणार्‍या खर्चासाठी वापरण्यासाठी असते.

सोबतच नोकरदार मंडळी काही आपत्कालीन परिस्थितीमध्येही ती काढू शकतात. त्यासाठी EPF स्कीम मध्ये विशिष्ट नियमावली आहे.

PF अकाऊंटमधून ऑनलाईन पैसे कसे काढाल? https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर क्लिक करा.

पीएफ अकाऊंट पाहण्यासाठी UAN आणि password योग्य भरा. ‘Online Services’टॅबमध्ये ‘Claim (Form-31, 19, 10C & 10D)’वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हांला युएएनसोबत लिंक असलेला बॅंक अकाऊंट नंबर द्यावा लागेल. पुढे व्हेरिफायवर क्लिक करा. बॅंक डिटेल्स तपासल्यानंतर तुम्हांला अटी आणि शर्थी मान्य कराव्या लागतील.

‘Proceed For Online Claim’वर क्लिक करा. त्यानंतर नव्या विंडोमध्ये तुम्ही पात्र असलेल्या कारणांची यादी पाहता येते. त्यामधून योग्य कारण निवडा. पैसे काढण्याचं कारण दिल्यानंतर तुम्हांला तुमचा संपूर्ण पत्ता देणं आवश्यक आहे.

त्यानंतर स्कॅन केलेला चेक किंवा पासबूक कॉपी अपलोड करावी लागेल. पुढे ‘Get Aadhaar OTP’वर क्लिक करा. तुमच्या आधार सोबत लिंक असलेल्या क्रमांकावर एक नंबर येईल तो एंटर करा.

तुमचा पैसे काढण्यासाठीचा अर्ज अशाप्रकारे सादर केला जाईल. तुम्हांला चेक किंवा पासबूक व्यक्तिरिक्त इतर कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करावं लागत नाही.

तसेच तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये निवृत्त होण्याच्या 1 वर्ष आधी पर्यंत सुमारे 90% रक्कम पीएफ अकाऊंटमधून काढू शकता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24