आर्थिक

दादांनो! घरातील विजेचे बिल जास्त यायला आपणच आहोत कारणीभूत; आपल्या चुकांमुळे भरतो आपण अव्वाच्या सव्वा विजबिल

Published by
Ajay Patil

Electricity Saving Tips:- प्रत्येक व्यक्तीचा एक महिन्याचा आर्थिक बजेट असतो. त्यातल्या त्यात जर नोकरदार व्यक्ती असेल तर महिन्याला येणारा पगारामध्ये त्याला संपूर्ण महिन्याचे नियोजन तसेच बचत सगळ्या आर्थिक आघाड्यांवर व्यवस्थित काम करणे गरजेचे असते.

आपल्याला माहित आहे की महिन्याला घरचा किराणा तसेच विविध प्रकारचे ईएमआय, मोबाईल रिचार्ज, दूध वगैरेची बिले तसेच मेडिकलचा महिन्याला लागणारा खर्च इत्यादी अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा यामध्ये अंतर्भाव होतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचा खर्च असतो तो म्हणजे दर महिन्याला भरावे लागणारे विजबिल हे होय.

बऱ्याचदा विजबिल इतक्या मोठ्या प्रमाणावर येते की आपल्या महिन्याचा आर्थिक बजेट देखील विस्कटतो व मोठा आर्थिक फटका बसू शकतो. परंतु हे असे का होते? याचा जर आपण बारकाईने शोध घेतला तर यामध्ये आपल्याच चुका आपल्याला नडलेल्या असतात व त्याचाच परिणाम म्हणजेच विजबिल जास्त येते. त्यामुळे या लेखात आपण अशा कोणत्या छोट्या चुका आहेत की त्यांचे थेट कनेक्शन हे विज बिल जास्त येण्याशी आहे. याबद्दलची माहिती बघू.

या चुकांमुळे भरावे लागू शकते तुम्हाला जास्तीचे वीजबिल

1- मोबाईल चार्जर वापरताना केलेल्या चुका- आता प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल चार्जर असते. परंतु आपण जेव्हा दररोज मोबाईल चार्जिंग करतो आणि मोबाईल चार्जिंग झाल्यानंतर तो काढतो. परंतु किती लोक मोबाईल काढल्यानंतर चार्जरची पिन काढतात व बटन बंद करतात? तर बऱ्याच जणांचे उत्तर नाही असे असेल.

परंतु ही छोटीशी चूक घरातील विजेचे बिल वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे घरातील स्विच बोर्डावरील अनेक बटणे बऱ्याचदा चालूच राहतात. त्यामुळे अशी चालू बटणे बंद करणे खूप गरजेचे आहे. तसेच बऱ्याच जणांना सवय असते की मोबाईल चार्ज झाल्यानंतर मोबाईल तर काढतात परंतु चार्जरचा स्विच तसाच चालू ठेवतात.

त्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की स्वीच जरी चालू राहिला आणि फोन चार्ज लावला नसेल तर विज बिल येणार नाही किंवा विजेचा वापर होत नाही. तर हा तुमचा निव्वळ गोड गैरसमज आहे. कारण इलेक्ट्रिक बोर्ड वर चार्ज केल्यामुळे वीज वापरली जाते आणि यामुळे युनिट देखील कापले जात असते.

फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या चार्जरचा वापर
आता बरेच जण स्मार्टफोन वेगात चार्ज होण्यासाठी वेगवान चार्जिंग सपोर्ट असलेले चार्जर वापरतात. या प्रकारचे चार्जर अगदी कमीत कमी वेळेमध्ये स्मार्टफोनला चार्ज करत असतात.

परंतु या प्रकारचे चार्जर सर्वात जास्त वीज वापरतात. त्यातल्या त्यात तुम्ही चार्जर प्लग इन करून जर चार्जर तसाच चालू ठेवला तर मात्र चार्जर चा वापर न करता देखील भरपूर विज त्या चार्जरच्या माध्यमातून वापरली जाते. तुम्ही स्विचला चार्जर जोडलेला आहे व बटन ऑन आहे व अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल चार्जिंगला लावला नसेल तरी देखील विजेचा वापर जास्त होतो.

अशाप्रकारे चार्जर बोर्डवर बसवला आहे आणि बटन सुरू असेल तरी विजेचा वापर होण्याच्या प्रक्रियेला निष्क्रिय भार असे म्हणतात. यामुळे फोन चार्जरशिवाय असला तरी देखील चार्जर कनेक्ट केलेले असल्यास विजेचा वापर 0.1 ते 0.4 युनिट पर्यंत असू शकतो.

इतर इलेक्ट्रिक उपकरणे
ज्याप्रमाणे फोनचे चार्जर ऑन असेल व त्यावेळी फोन चार्जिंगला नसेल तरी देखील विजेचा वापर होत राहतो हे आपण पाहिले. अगदी त्याचप्रमाणे घरातील कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल आणि त्याचा स्विच ऑन असेल व त्याचा वापर जरी होत नसेल तरी देखील वीज वापरली जात असते. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे हे विज बिल कमी करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.

घरातील आवश्यक उपकरणांचा वापर करताना काळजी घेणे
बऱ्याच जणांना सवय असते की,घरातील पंखा देखील विनाकारण चालू असतो किंवा गरज नसताना बल्ब सुरू असतात. यामुळे देखील वीज बिल जास्त येते. अशी उपकरणे कोणत्याही कारणाशिवाय चालू राहिल्यास विज बिल जास्त येऊ नये याकरिता यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आवश्यकता नसेल तर आठवणीने अशी उपकरणे बंद करणे गरजेचे आहे.

जेव्हा गरज नाही तेव्हा घरातील पंखे आणि बल्ब आठवणीने बंद करणे खूप गरजेचे असते. जवळपास प्रत्येक घरामध्ये पंखा किंवा बल्ब गरज नसताना बंदच केले जातात. परंतु कित्येक जणांना पंखा किंवा बल्ब घरामध्ये विनाकारण सुरू ठेवण्याची सवय असते किंवा बंद करण्याची आठवण तरी पडत असते. हीच छोटीशी चूक वीज बिल जास्त येण्याला कारणीभूत ठरते.

Ajay Patil