Lowest Gold Rate : सोने आणि चांदी हे दोन अनमोल रत्न गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शन ठरतात. अनेकजण सोने आणि चांदी मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन बनवत आहेत. याशिवाय सोन्याला हिंदू सनातन धर्मात देखील मोठी मान्यताप्राप्त आहे.
शुभप्रसंगी सोन्याची खरेदी करणे उत्तम असण्याचे बोलले जाते. यामुळे सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची खरेदी वाढते. दिवाळी, अक्षय तृतीया, मकर संक्रांति अशा नानाविध पर्वावर सोन्याची खरेदी वाढते. खरे तर, सोन्याच्या किमती आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण जगातील कोणते असे टॉप पाच देश आहेत जिथे स्वस्तात सोने मिळते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कुठे मिळत सर्वात स्वस्त सोन
होंगकोंग : हॉंगकॉंग मध्ये जगातील सर्वात स्वस्त सोनं मिळतं. तज्ञ लोक सांगतात की ग्लोबल ट्रेडिंग हबमुळे या ठिकाणी स्वस्त सोन मिळतं. जगातील अनेक देशांच्या तुलनेत हॉंगकॉंग मध्ये स्वस्त सोने मिळत असल्याचा दावा केला जातो.
दुबई : दुबईमध्ये सुद्धा स्वस्तात सोने उपलब्ध होते. सर्वात स्वस्त सोने मिळणाऱ्या देशात याचे नाव दुसऱ्या स्थानावर येते. या शहरात दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावत असतात. पर्यटनासाठी येथे जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. पर्यटनासोबतच दुबई उद्योगासाठी देखील खूपच लोकप्रिय आहे. दरम्यान या उद्योग नगरीत सोने देखील स्वस्तात मिळत असल्याचा दावा केला जातो. दुबई सरकार सोन्यावर टॅक्स लावत नसल्याने तेथे सोने स्वस्त मिळते.
मेक्सिको : या यादीत मेक्सिको हे तिसऱ्या क्रमांकावर येते. येथे गोल्ड कॉइन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. गोल्ड कॉइन साठी हा देश संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. येथे देखील सोन्याच्या किमती जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे पाहायला मिळते.
भूतान : भारतातील शेजारील राष्ट्र भूतान येथे देखील सोन्याच्या किमती खूपच कमी आहेत. याचे कारण म्हणजे येथे सोने टॅक्स फ्री मिळते. यामुळे या देशात सोन्याच्या किमती जगातील अनेक देशांच्या तुलनेत कमी आहेत.
स्वित्झर्लंड : हा देश आपल्या गोल्ड रिफायनरी मुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या देशात असणाऱ्या गोल्ड रिफायनरीमुळे तेथे सोन्याच्या किमती जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी पाहायला मिळतात. सर्वात स्वस्त सोने मिळणाऱ्या देशांच्या यादीत हा देश पाचव्या क्रमांकावर येतो.