अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- सध्या तोटयात असणारी एअर इंडिया या कंपनीने ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांवर 50% सूट जाहीर केली आहे. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही सूट मिळेल. बुधवारी विमान वाहतूक मंत्रालयाने या योजनेची माहिती दिली.
यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रवासाच्या दिवसाच्या किमान 7 दिवस आधी तिकिट बुकिंग आवश्यक आहे. ही योजना डोमेस्टिक फ्लाइट्स साठी आहे.
चेक इन करताना व्हॅलिड आयडी दर्शविला गेला नाही तर बेसिक भाडे वसूल केले जाईल आणि पैसे परत मिळणार नाहीत. या योजनेची संपूर्ण माहिती एअर इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
* ‘हे’ आहेत नियम
* एअरलाईनवर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज :- तोट्यात असणाऱ्या एअर इंडियावर 60 हजार कोटींहून अधिक कर्ज आहे. सरकारला ते विकायचे आहे. पूर्वी याकरिता बोली मागविण्यात आली होती.