RBI News : केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशात कॅशलेस इकॉनॉमीला मोठी चालना मिळाली. केंद्रशासन नागरिकांना आता कॅशलेस व्यवहारासाठी विशेष प्रोत्साहित करत आहे. कॅशलेस व्यवहार वाढावेत यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. विशेष म्हणजे कॅशलेस व्यवहाराला आता देशात चांगली गती मिळाली आहे. लोकांना कॅशलेस व्यवहार अधिक सोयीचे आणि सोपे वाटू लागले आहेत.
आता यूपीआय पेमेंट अँप्लिकेशनच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार प्रामुख्याने होऊ लागले आहेत. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कॅशने व्यवहार होतात. आधीच्या तुलनेत ही संख्या कमी झालेली असली तरी देखील कॅश व्यवहार पूर्णपणे बंद झालेले नाहीत. कॅशने व्यवहार करताना प्रामुख्याने नोटांचा वापर केला जातो. आपल्या देशात नोटा आणि डॉलर म्हणजेच कॉइन चलनात आणले गेले आहेत.
मात्र यामध्ये सर्वाधिक व्यवहार हा नोटांमध्येच होतो. मित्रांनो नोटा या चलनात येतात आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे, दुसऱ्या माणसाकडून तिसऱ्या माणसाकडे अशा सर्क्युलेट होत राहतात. एक नोट संपूर्ण देशाचे भ्रमण करते. यामुळे या नोटांची अवस्था जीर्ण होते. नोटा फाटून जातात. अशा परिस्थितीत या नोटा बँकेच्या माध्यमातून आरबीआय कडे जमा केल्या जातात.
आपण नोट फाटली की बँकेत जातो आणि ती नोट जमा करतो. आरबीआयचा नियम देखील तसं सांगतो. आरबीआयच्या नियमानुसार बँकेने ग्राहकांकडून फाटलेल्या नोटा स्वीकारल्या पाहिजेत. बँका फाटलेल्या नोटा कुठल्याही सबबीवर स्वीकारणे नाकारू शकत नाही.
मात्र आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आरबीआय कडे ज्या फाटलेल्या नोटा जमा होतात त्या नोटांचे आरबीआय नेमके करते काय. आज आपण याच प्रश्नांचे थोडक्यात उत्तर जाणून घेणार आहोत.
फाटलेल्या नोटांचे RBI काय करते
नोटा छापतानाच या नोटा किती दिवस सहज चलनात राहू शकतात हे त्यांचे आयुष्य ठरवले जाते. जेव्हा हा कालावधी संपतो किंवा चलनातील नोटा अन्य काही कारणांनी खराब होतात. नोटा फाटतात. तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा या नोटा ताब्यात घेते. नोटा परत आल्यावर बँक त्या स्वतःकडे जमा करते.
जेव्हा एखादी नोट जुनी होते किंवा चलनासाठी योग्य नसते तेव्हा ती व्यापारी बँकांमार्फत जमा केली जाते. त्यानंतर ती पुन्हा बाजारात पाठवले जात नाहीत. पूर्वी या जुन्या नोटा टाकाऊ आणि जाळल्या जात होत्या, पण आता तसे होत नाही. आता पर्यावरणाचा विचार करून विशेष मशिनद्वारे त्यांचे छोटे तुकडे केले जातात आणि नंतर त्यांचा पुनर्वापर केला जातो. त्यातून इतर अनेक प्रकारची उत्पादने तयार करून बाजारात विकली जातात.