3 वर्षाच्या एफडीवर कोणती बँक देत आहे सर्वोच्च व्याजदर ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest Rate : गेल्या अडीच वर्षांच्या काळात रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये मोठी वाढ केली आहे. अलीकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कायम ठेवलेले असले तरीदेखील आधी रेपो रेट मध्ये मोठी वाढ झालेली आहे.

याचा परिणाम म्हणून एफडीच्या व्याजदरात देखील वाढ करण्यात आली आहे. अनेक बँकांनी एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना एफडी मधून आता चांगला पैसा मिळू लागला आहे. परिणामी येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे इन्क्रीज होत आहे.

विशेष म्हणजे जाणकार लोक देखील एफडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून तीन वर्षासाठी एफडी करायचे असेल तर कोणत्या बँकेकडून सर्वोच्च व्याजदर मिळते?

हा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तीन वर्षाची एफडी करायची असेल तर कोणती बँक सर्वाधिक व्याजदर देते याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.

एफडीवर अधिक व्याज देणाऱ्या बँका

स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेच्या माध्यमातून एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याजदर दिले जात आहे. या बँकेत तीन वर्षासाठी जर एफडी केली तर बँकेच्या माध्यमातून सात टक्के व्याज दराने रिटर्न मिळतो.

कॅनरा बँक : कॅनरां बँक आपल्या ग्राहकांसाठी कायमच वेगवेगळ्या योजना राबवत असते. एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी देखील बँकेच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. ही बँक तीन वर्षांच्या कालावधीसाठी जर गुंतवणूकदारांनी एफडी केली तर 6.85% व्याजदराने रिटर्न देत आहे.

एचडीएफसी बँक : प्रायव्हेट क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी ची ओळख आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना सुरू करत असते. बँकेच्या माध्यमातून एफडी करणाऱ्यांना देखील चांगला परतावा दिला जात आहे. या बँकेत तीन वर्षांसाठी जर एफडी केली तर गुंतवणूकदारांना सात टक्के व्याजदराने रिटर्न मिळतात.

आयसीआयसीआय बँक : या बँकेकडून देखील एफ डी वर चांगले व्याजदर दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षांच्या कालावधीसाठी जर या बँकेत एफडी केली तर सदर गुंतवणूकदाराला सात टक्के व्याजदराने रिटर्न मिळतात.