FD Interest Rate : तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे.
कारण की आज आपण देशातील अशा पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या 365 दिवसांच्या एफडीवर म्हणजेच एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. खरे तर अलीकडे एफडी म्हणजेच मुदत ठेव करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणारे बहुतांशी लोक एफडी करण्यालाच प्राधान्य देत आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. यामुळे एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू लागला आहे.
विशेष बाब म्हणजे तज्ञांनी आगामी काही दिवसात एफडीच्या व्याजदरात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे एफडी करण्यासाठी हा काळ सर्वोत्कृष्ट राहणार असे बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत, जर तुम्हीही एफडी करू इच्छित असाल तर तुम्हाला 365 दिवसांसाठी कोणत्या बँका सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.
यामुळे आज आपण देशातील अशा टॉप पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जे एका वर्षाच्या टाईम पिरियडसाठी एफडीवर सर्वोत्कृष्ट व्याज देत आहेत.
एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
HDFC Bank : प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी ही सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून एका वर्षाच्या एफडीसाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 6.60% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडीसाठी 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एचडीएफसी कडून एक वर्षाचे एफ डी साठी 7.10% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.
ICICI Bank : प्रायव्हेट सेक्टरमधील देशातील ही आणखी एक मोठी बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्तात विविध कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. याशिवाय या बँकेकडून एफडीसाठी देखील चांगला परतावा दिला जात आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून एका वर्षाच्या एफडीसाठी 7.40% एवढे व्याज दिले जात आहे.
SBI Bank : ही बँक देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वाधिक मोठ्या बँकेकडून एका वर्षाच्या एफडी साठी चांगले व्याज ऑफर केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय बँकेकडून एका वर्षाच्या एफडी साठी 6.80% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.
Axis Bank : या बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी बँकेने एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. या बँकेकडून एका वर्षाच्या एफडीसाठी 6.7% एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे.
कोटक महिंद्रा : कोटक महिंद्रा बँकेकडून आपल्या ग्राहकांना एफडीसाठी चांगले व्याजदर दिले जात आहे. बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका वर्षाच्या एफडीसाठी बँकेकडून 7.10% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.