आर्थिक

कोणती इन्शुरन्स पॉलिसी फायद्याचे राहते? तुमच्यासाठी कोणता इन्शुरन्स ठरेल फायद्याचा? जाणून घ्या इन्शुरन्सच्या महत्त्वाच्या प्रकारांची माहिती

Published by
Ajay Patil

Insurance Plan:- जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक बाबतीत अनिश्चितता असते. त्यामुळे या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम किंवा स्वयंपूर्ण राहावे याकरिता गुंतवणूक महत्त्वाचे असते व त्या गुंतवणूक सोबतच इन्शुरन्स हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो.

जीवनामध्ये कोणती घटना केव्हा घडेल व त्यामुळे आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर कशा पद्धतीची परिस्थिती ओढवेल? या सगळ्या दृष्टिकोनातून इन्शुरन्सचे महत्व अनन्यसाधारण आहे.

जर आपण इन्शुरन्स चे प्रकार पाहिले तर ते जवळपास सहा ते सात प्रकार असून व्यक्तीच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.

या अनुषंगाने इन्शुरन्सचे महत्व ओळखून या लेखांमध्ये आपण इन्शुरन्सच्या प्रकारांची थोडक्यात माहिती घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कोणता इन्शुरन्स निवडावा? याबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल.

हे आहेत इन्शुरन्सचे महत्वाचे प्रकार

1- टर्म लाइफ इन्शुरन्स हा एक इन्शुरन्सचा खूप महत्त्वाचा असा प्रकार असून घरामध्ये तुम्ही जर कर्ते किंवा कमावती व्यक्ती असेल तर तुम्ही हा इन्शुरन्स घेणे फायद्याचे ठरेल. ही एक पारंपारिक विमा पॉलिसीअसून यामध्ये मुदतीच्या आत विमा असलेल्या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यास  अशा व्यक्तीला अशा घटनेच्या वेळी किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला विम्याच्या रकमेचा लाभ मिळतो.

म्हणजेच दुर्दैवाने तुमच्या आयुष्याचे काही बरे वाईट झाले तर तुमच्या पश्चात तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना म्हणजेच तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे.

यामध्ये मुदत जीवन विमा पॉलिसीच्या कालावधी दहा वर्ष ते मृत्यू होईपर्यंत असा देखील ठेवता येतो.  प्रीमियम बघितला तर तो व्यक्तीचे वय आणि विमा कवर यावर अवलंबून असतो.

2- हेल्थ इन्शुरन्स आरोग्य ही व्यक्तीची सगळ्यात मोठी संपत्ती समजली जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणती समस्या केव्हा उद्भवेल हॉस्पिटलमध्ये किती खर्च लागेल याबाबत आपल्याला कुठल्याही प्रकारची शाश्वती देता येत नाही.

अशा प्रसंगी जर तुम्ही आरोग्य विमा घेतलेला असेल तर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा अपघातामुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण प्रदान करतो.

प्रत्येक व्यक्तीला त्यामुळे आरोग्य विमा घेणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा आयुष्यभराचे संपूर्ण कमाई देखील हॉस्पिटलच्या खर्चामध्ये वाया जाऊ शकते.

अशावेळी आरोग्य विमा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. आरोग्य विम्याचा प्रीमियम हा व्यक्तीचे वय तसेच आजार आणि आरोग्य विम्याच्या माध्यमातून मिळणारा कव्हर यावर अवलंबून असते.

3- पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स वैयक्तिक अपघात विमा हा देखील विम्याचा खूप महत्त्वाचा असा प्रकार आहे. एक्सीडेंट मुळे जर तात्पुरते, कायम व पूर्णपणे शारीरिक दुर्बलता आल्यास पॉलिसीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते.

अशा कालावधीमध्ये घरगुती रोजचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक किरकोळ मदत देखील या माध्यमातून मिळते. तसेच अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास एक निश्चित रक्कम यामध्ये मिळते.

4- रिटायरमेंट इन्शुरन्स प्लान -संपूर्ण जीवनामध्ये आर्थिक समृद्ध असणे खूप गरजेचे असते व प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतर तुमचे आर्थिक स्थैर्य कायम राहणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखा समाधानाने जाण्यासाठी सेवानिवृत्ती विमा योजनेमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते.

आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुमच्या आयुष्य सुखात घालवण्यासाठी रिटायरमेंट इन्शुरन्स प्लान चा खूप मोठा फायदा होतो. यामध्ये मार्केट युनिट लिंक आणि दुसरा ट्रॅडिशनल किंवा इंडोर्समेंट खात्रीशीर बेनिफिट देणारे प्लॅन उपलब्ध आहेत.

तुम्ही कमाई करत असतात तेव्हा पद्धतशीर गुंतवणूक करून रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी पैसा उभा या माध्यमातून करू शकतात. या प्लॅनमध्ये प्रीमियम हा तुम्हाला आवश्यक असलेला निधी आणि वर्ष यावर ठरत असतो.

5- चिल्ड्रन इन्शुरन्स प्लान चिल्ड्रन इन्शुरन्स प्लॅन हे मुलांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. पालकांनी त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणुकीचे आणि त्यांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून चाइल्ड इन्शुरन्स प्लान महत्त्वाचे ठरतात.

या प्लॅनच्या माध्यमातून पालक आणि पाल्य अशा दोघांना विमा कव्हरेज मिळते. समजा पालकांचा जर आकस्मिक मृत्यू झाला तर पाल्याच्या शिक्षणाचा संपूर्ण आर्थिक भार ही योजना सांभाळत असते.

तसेच मुलांचे उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण आणि त्यांचा विवाह इत्यादी साठी हा प्लान खूप फायद्याचा ठरतो. आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना खूप महत्त्वाची आहे.

Ajay Patil