Fixed Deposit Interest Rates : भविष्यात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू नये म्हणून, आज सर्वजण गुंतवणुकीस प्राधान्य देत आहेत. बाजारात सध्या विविध प्रकारचे पर्याय आहेत जे प्रचंड नफा देत आहेत, परंतु त्या पर्यायांमध्ये धोका देखील आहे. म्हणूनच, जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत आणि कोणतीही जोखीम न घेता पैसे गुंतवायचे असतील तर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकता.
सध्या अनेक बँका आणि वित्तीय कंपन्या FD वर प्रचंड व्याज देत आहेत. अलीकडेच अनेक बँकांनी त्यांच्या एफडी योजनांमधील व्याजदर देखील वाढवले आहेत. त्याचबरोबर आता बँक ऑफ बडोदानेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
बँकेच्या या विशेष योजनेद्वारे ग्राहकांना फायदा मिळणार आहे. बँकेने सध्या विशेष पावसाळी योजना सुरु केली आहे ज्याअंतर्गत ग्राहकांना भरघोस परतावा मिळणार आहे. चला त्या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
जर तुम्ही ते करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदाने FD व्याजदर वाढवले आहेत. बँक मान्सून स्पेशल स्कीम अंतर्गत उच्च व्याजदराचा लाभ देत आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता आणि ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या व्याजदराचा लाभ दिला जात आहे.
बँक ऑफ बडोदातर्फे विशेष मान्सून योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत तुम्हाला ३ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. विशेष मान्सून ठेव योजनेअंतर्गत तुम्हाला 333 दिवस आणि 399 दिवसांच्या एफडीवर अधिक व्याज मिळेल.
BoB विशेष मान्सून ठेव योजनेअंतर्गत, सामान्य लोकांना 333 दिवस आणि 399 दिवसांच्या FD वर 7.25 टक्के व्याजाचा लाभ मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजाचा लाभ मिळेल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 7.15 टक्के जास्त व्याज मिळेल.
BOB ची विशेष मान्सून योजना कधी पासून सुरु होईल?
बँक ऑफ बडोदा विशेष मान्सून योजना सुरू करण्यात आली आहे. FD वर अधिक व्याजदर मिळविण्यासाठी, ग्राहक बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. ऑनलाइन सेवेअंतर्गत, ग्राहक बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत साइटवरून सहजपणे एफडी करू शकतील.