Wipro Share Price:- विप्रो ही आयटी क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीचे ऑक्टोबर- डिसेंबर 2024 या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या पद्धतीचे आल्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये सकारात्मक असे संकेत दिसून येत आहेत व विप्रोच्या शेअरमध्ये 20 जानेवारी रोजी म्हणजेच आज आठ टक्के पर्यंत वाढ झाली
व या वाढीसह BSE वर शेअरची किंमत 305.35 रुपयांवर पोहोचली. या सगळ्या सकारात्मक परिस्थितीमुळे विप्रोसाठी तज्ञांनी काही अंदाज देखील आता अपग्रेड केले असून याची परिणीती शेअरच्या खरेदीत वाढ झाल्यात दिसून येत आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर 2024 तिमाहित विप्रोचा एकत्रित निव्वळ नफ्यात झाली वार्षिक 24.4% ची वाढ
ऑक्टोबर-डिसेंबर 2024 या तिमाहीमध्ये विप्रोचा एकत्रित निव्वळ वार्षिक नफा 3354 कोटी रुपये झाला व यामध्ये वार्षिक 24.4% ची वाढ झाली. कंपनीला विविध ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल 22 हजार 349 कोटी रुपये मिळाला
व जो एका वर्षांपूर्वीच्या तुलनेमध्ये तब्बल 0.5 टक्क्यांनी जास्त आहे. तसेच येणाऱ्या जानेवारी-मार्च 2025 तिमाहीसाठी विप्रोला आयटी सेवा व्यवसायातून $ 2602 दशलक्ष ते $2655 दशलक्ष दरम्यान महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म नोमूराने दिली टार्गेट प्राईस
सध्या जर विप्रोचे मार्केट कॅप बघितले तर ते तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे व या सगळ्या परिस्थितीमध्ये एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 25 टक्क्यांची वाढ झालेली आहे.
या सगळ्या सकारात्मक परिस्थितीमध्ये प्रसिद्ध ब्रोकरेज फार्म नोमुराने विप्रोच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या उत्पन्नातील वाढीचे सर्व पॅरामीटर्सवर व खासकरून मार्जिन आघाडीवर खूप कौतुक केले आहे व यामुळे नोमूराने 340 रुपयांच्या टार्गेट प्राईससह विप्रोच्या स्टॉकवर आपला बाय कॉल कायम ठेवलेला आहे.
इतकेच नाहीतर मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने देखील विप्रोच्या स्टॉकसाठी आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवत प्रति शेअर 330 टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीसने अलीकडेच या स्टॉकला बाय रेटिंगमध्ये अपग्रेड केले आणि प्रतिशेअर 350 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ब्रोकरेज सिटीने मात्र यावर सेल कॉल कायम ठेवला आहे व प्रतिशेअर 280 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.