आर्थिक

SBI सह ‘या’ सरकारी बँका ग्राहकांना देतायत अगदी स्वस्तात कर्ज ! जाणून घ्या काय आहे ही दिवाळी ऑफर

Published by
Ahmednagarlive24 Office

Loan News : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु होतोय. दिवाळी हा मोठा सण साजरा होत आहे. या सणासुदीच्या काळात अनेक ई-कॉमर्स साइट्स आणि इतर कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर्स देत असतात.

आता यामध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही मागे राहिलेल्या नाहीत. आपल्या ग्राहकांना आपल्यासोबतच ठेवण्यासाठी बँक खास फेस्टिव्ह ऑफर देत आहेत. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांनी ग्राहकांसाठी दिवाळी ऑफर आणली आहे,

ज्याद्वारे तुम्ही स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात. चला आपण याठिकाणी महत्वाच्या बँकांच्या लोन बाबतीत असणाऱ्या ऑफर्स विषयी जाणून घेऊयात –

कोणत्या बँका देत आहेत स्वस्त कर्ज?

जर तुम्हाला होम लोन, पर्सनल लोन, कार लोन किंवा इतर कोणतेही लोन घ्यायचे असेल तर दिवाळी ऑफर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना या फेस्टिव्ह ऑफरअंतर्गत स्वस्त कर्ज देत आहेत.

SBI लोन ऑफर

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 1 सप्टेंबर 2023 पासून फेस्टिव्हल ऑफरचा लाभ देत आहे. ही ऑफर 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना सिबिल स्कोअरच्या आधारे टर्म लोनबेनिफिट्स मिळतील,

ज्याअंतर्गत त्यांना कर्जाच्या व्याजदरात सूट मिळेल. स्कोअर जास्त असेल तर ग्राहकाला जास्त डिस्काऊंटचा फायदा मिळेल. जर एखाद्याचा सिबिल स्कोअर 750 च्या आसपास असेल तर त्याला 8.7 टक्के व्याजदराने फिक्स्ड लोनचा लाभ मिळू शकतो. याशिवाय होम किंवा कार लोन घेणाऱ्यांनाही या ऑफरचा फायदा मिळणार आहे.

PNB लोन ऑफर

पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना दिवाळी ऑफर देत आहे. या अंतर्गत गृहकर्ज ग्राहकांना वार्षिक 8.4 टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. याशिवाय कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार नाही किंवा कागदी शुल्क आकारले जाणार नाही. अशा प्रकारे तुम्ही खूप पैसे वाचवू शकाल आणि बँकेकडून गृहकर्ज मिळवू शकाल. बँकेत जाऊन या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

BOB लोन ऑफर

बँक ऑफ बडोदा (BOB) देखील आपल्या ग्राहकांना फेस्टिवल ऑफर्स देत आहे. ग्राहकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. या विशेष ऑफरअंतर्गत गृहकर्जाचे व्याजदर 8.4 टक्क्यांपासून सुरू होतील.

कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय ग्राहक 8.7 टक्के वार्षिक व्याजदराने कार लोन घेऊ शकतात. कार लोन किंवा एज्युकेशन लोनवर प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही.

तुम्ही सर्व जण याचा लाभ घेऊ शकता. तुमची स्वप्न स्वस्तात पूर्ण करण्यासाठी या बँकेच्या फेस्टिव्ह ऑफरचा तुम्ही 100 टक्के लाभ मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office