आर्थिक

लाडक्या बहिण योजनेतून मिळालेल्या पैशातून लढवली शक्कल व सुरू केला व्यवसाय! दहा दिवसात कमावले इतके पैसे….

Published by
Ajay Patil

महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची व चर्चेला असणारी सध्याची योजना जर कोणती असेल तर ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय. आपल्याला माहित आहे की, सध्या या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यामध्ये झाली व यामध्ये ज्यांनी जुलै व ऑगस्ट या दरम्यान या योजनेसाठी अर्ज भरले  अशा महिलांच्या खात्यावर दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपयांचा लाभ थेट हस्तांतरित करण्यात आला.

या योजनेच्या माध्यमातून जी काही पंधराशे रुपयांची मदत मिळत आहे ती अनेक दृष्टीकोनातून महिलांसाठी महत्त्वाची अशी ठरताना दिसून येत आहे. जरी ही महिन्याला मिळणारी रक्कम कमी वाटत असली तरी देखील ती अनेक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण पैसा हा कितीही असला तरी त्याची किंमत ही खूप मोठी असते.

अगदी हाच मुद्दा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर मुंबई येथील काळाचौकी परिसरामध्ये राहणाऱ्या प्रणाली बारड यांच्या माध्यमातून समजून घेता येईल. प्रणाली ताईंनी या योजनेतून जे काही पैसे मिळाले त्या माध्यमातून घुंगरू व्यवसाय सुरू केला व या गणपती उत्सवाच्या कालावधीमध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे नाव तर प्रसिद्धीच्या झोतात आणलेच परंतु त्या माध्यमातून पैसे कमवण्याची किमयादेखील साध्य केली आहे.

 लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशात सुरू केला घुंगरू व्यवसाय

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथील काळाचौकी परिसरामध्ये राहणाऱ्या प्रणाली कृष्णा बारड या इतर महिलांप्रमाणेच माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या व त्यांना या योजनेतून पैसे मिळाले व या पैशातून त्यांनी घुंगरू व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये त्यांना स्वतःच्या नावाची ओळख तर करून देता आलीच परंतु त्या माध्यमातून त्यांना पैसे देखील कमवता आले.

विशेष म्हणजे त्यांच्या या व्यवसायाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली व या लाडक्या बहिणीचे कौतुक केले. प्रणाली यांनी हा घुंगरू व्यवसाय सुरू करून त्याचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर केला. हा गणेश उत्सवाचा कालावधी सुरू झाल्यानंतर त्यांनी या व्यवसायातून दहा हजार पेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे.

याबाबतीत प्रणाली यांनी मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानले. या योजनेच्या माध्यमातून जे काही पैसे मिळत आहेत त्याचा योग्य वापर करण्याचे आवाहान देखील त्यांनी इतर महिलांना केले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये त्यांनी सुरू केलेल्या घुंगरांचा वापर करून गणपती आरती आणि धार्मिक ठिकाणी ध्वनीचा  नाद करण्यासाठी केला जात आहे.

त्यामुळे या गणेशोत्सव कालावधीमध्ये सुरू केलेल्या या घुंगरू व्यवसायाला चांगलीच मागणी आहे. याच्यापुढे त्यांची हा व्यवसाय अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत.

 मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला टोला

ज्यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मात्र अनेकांनी त्या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या रकमेची खिल्ली उडवली होती व पंधराशे रुपयांमध्ये काय होणार असे प्रश्न विचारून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केलेला होता.

परंतु या मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या ओवाळणीचा सन्मान आणि किंमत माझ्या लाडक्या बहिणींना नेमकी उमगली व त्यामुळेच या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला. या छोट्याशा रकमेतून काय करता येऊ शकते याचे उदाहरण आपल्यासमोर आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पंधराशे रुपयांतून काळाचौकीच्या प्रणाली या बहिणीने गणेशोत्सव कालावधी लक्षात घेऊन पंधराशे रुपयातून एक छोटासा व्यवसाय सुरू केला व आज त्या मोठी कमाई करून  दाखवत असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Ajay Patil