Women Success Story:- महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे जे काही प्रयत्न आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती व स्मार्ट प्रकल्प अर्थात उमेदच्या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील अनेक ठिकाणच्या महिला आता एकत्र येऊन अनेक प्रकारच्या उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती करत आहेत.
या माध्यमातून महिलांनी अनेक प्रकारचे छोटे-मोठे उद्योग सुरू केले आहेत.शेतकरी महिला बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊन शाश्वत रोजगारासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत व या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करताना आपल्याला दिसून येत आहे.
अगदी याच प्रकारे जर आपण म्हाडा तालुक्यातील 628 शेतकरी महिलांची यशोगाथा बघितली तर या महिला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती व स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शाश्वत रोजगारासाठी एकत्र आल्या व त्यांनी पिंपळनेर येथे माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून कमीत कमी कालावधीमध्ये लाखोची उलाढाल करायला सुरुवात केलेली आहे.
महिला बनल्या उद्योजक आणि करतात वर्षाला 30 लाखाची उलाढाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माढा तालुक्यातील 628 शेतकरी महिला उमेदच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत एकत्र आल्या व त्यांनी पिंपळनेर येथे माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली व या कंपनीने कमी वेळेमध्ये लाखोंची उलाढाल करायला सुरुवात केलेली आहे.
यामध्ये माढा तालुक्यातील पिंपळनेर तसेच तांबवे, सापटणे, अकुंभे, शौर्य तसेच वेणेगाव, माळेगाव, अकोले, शिराळ, परिते, मालवण तसेच भोईंजे व आहेरगाव अशा गावातील 628 महिला एकत्र आल्या व त्यांनी एक हजार रुपयांचे समभाग खरेदी करत कंपनीत गुंतवणूक केली.
या कंपनीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कंपनीद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली जाते व फळभाज्या तसेच पालेभाज्या रोख स्वरूपात खरेदी करून तो माल स्थानीक बाजारपेठेत विक्री केला जातो.
इतकेच नाही तर या कंपनीच्या माध्यमातून मॉल्स तसेच शहरी भागात विविध प्रकारच्या शेतीमालाचा पुरवठा केला जातो. आज पर्यंत जर या कंपनीचा इतिहास बघितला तर या कंपनीने डाळिंब तसेच मका व पेरू, आंबा अशा विविध पिकांची खरेदी केली असून ही फळे व भाज्यांचे निर्जलीकरण करून त्यांची पूड बनवून ते बाजारपेठेत विक्री केली आहे.
तसेच टेक्नो सर्वे कंपनीची मदत घेऊन बांबू, साग, शिसव तसेच चिंच, आवळा, महोगणी, करंज आणि ऑस्ट्रेलियन बाबुळासह विविध रोपांची निर्मिती करून जवळपास 30 हजार रुपयांची विक्री या कंपनीने केली आहे.
तीस लाखांची उलाढाल आणि अडीच लाखांचा नफा
2022 मध्ये या कंपनीची स्थापना झाली व जवळपास 2023-24 मध्ये कंपनीने व्यवसायाला सुरुवात केली व एका वर्षात तीस लाख रुपयांची उलाढाल केली आहे या उलाढालीतून अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा या कंपनीला मिळाला आहे.
तीन टन पेरूची केली दुबईत निर्यात
माढेश्वरी महिला उत्पादक कंपनीने ग्रामीण भागातून शेतीमालाची खरेदी केली व त्यात तीन टन पेरू खरेदी करून तो दुबईला निर्यात केला. स्थानिक बाजारपेठेत पेरूला 55 रुपये प्रति किलोचा दर मिळत असताना
मात्र कंपनीने दुबईला जो काही पेरू निर्यात केला त्याला तब्बल 85 रुपये प्रति किलो दर मिळाला.अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायातून माढेश्वरी महिला उत्पादक कंपनी व्यवसायामध्ये यश मिळवत आहे. विशेष म्हणजे उमेद महिला स्वयंसहायता समूहाची माढा तालुक्यातील ही पहिलीच कंपनी आहे.