आर्थिक

यूपीआयला इतर देशांच्या जलद पेमेंट सिस्टमशी जोडून सीमापार पेमेंट वाढवण्याच्या दिशेने काम सुरु !

Published by
Mahesh Waghmare

२९ जानेवारी २०२५ मुंबई : बचत करण्याची प्रवृत्ती असलेल्या भारतात क्रेडिट कार्डचा वापर लक्षणीय वाढला आहे. पाच वर्षांत क्रेडिट कार्डची संख्या दुप्पट होऊन सुमारे १०.८० कोटी झाली आहे, पण त्या तुलनेत डेबिट कार्डची संख्या मात्र तुलनेने स्थिर राहिली असल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

२०१९ मध्ये ५.५३ कोटी कार्ड चलनात असताना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये क्रेडिट कार्डची संख्या दुप्पट होऊन सुमारे १०.८० कोटींवर गेली आहे. डेबिट कार्डाची संख्या तुलनेने स्थिर राहिली असून ती डिसेंबर २०१९ मधील ८०.५३ कोटींवरून डिसेंबरअखेर ९९.०९ कोटींपेक्षा थोडी वाढली आहे.

त्याचबरोबर गेल्या दशकात भारतात डिजिटल पेमेंटमध्ये वेगाने वाढ झाली आहे. २०१३ मध्ये ७७२ लाख कोटी रुपये मूल्याचे २२२ कोटी डिजिटल व्यवहार झाले. गेल्या वर्षात संख्यात्मकदृष्ट्या हे प्रमाण ९४ पटीने वाढून २०,७८७ कोटींचे व्यवहार आणि मूल्यदृष्ट्या या व्यवहारात ३.५ पटीने वाढ होऊन ते – २,७५८ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

गेल्या पाच वर्षांत भारतात डिजिटल पेमेंटचे प्रमाण ६.७ पट आणि मूल्य १.६ पटीने वाढले आहे.डिजिटल पेमेंटच्या परिमाणदृष्ट्या ४५.९ टक्के आणि डिजिटल पेमेंटच्या मूल्याच्या संदर्भात पाच वर्षांत१०.२ टक्के संकलित वार्षिक वाढीची नोंद केली आहे.आर्थिक समावेशकतेवर लक्ष केंद्रित करत स्मॉल फायनान्स बँकांनी १०.९७ लाख कार्डासह डिसेंबर २०२४ च्या अखेरीस या क्षेत्रांत प्रवेश केला आहे.रिझर्व्ह बँकेला १ जानेवारी २०१९ पासून फक्त ईव्हीएम चिप आणि पिन आधारित डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणे अनिवार्य केले आहे.यूपीआयला इतर देशांच्या जलद पेमेंट सिस्टमशी जोडून सीमापार पेमेंट वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.