आर्थिक

एसबीआयमध्ये एफडी करणे फायद्याचे ठरेल की पोस्ट ऑफिसमध्ये टर्म डिपॉजिट करणे ? जाणकार लोकांनी स्पष्टच सांगितलं

Published by
Ahmednagarlive24 Office

SBI FD Vs Post Office FD : अलीकडे सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेतील एफडी तसेच पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

या अशा प्रकारच्या सुरक्षित गुंतवणुकीत मिळणारा परतावा हा म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटच्या तुलनेत खूपच कमी असतो मात्र सुरक्षित ठिकाणी केलेली गुंतवणूक कधीच तोट्यात जात नाही. यामुळे अनेकजण परताव्याची आशा न ठेवता सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.

मात्र असे असले तरी सुरक्षित गुंतवणुकीतच चांगला परतावा कुठून मिळू शकतो याबाबत नेहमीच गुंतवणूकदारांकडून प्रश्न उपस्थित केला जातो. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून एसबीआयमध्ये एफडी करणे फायद्याचे ठरेल की पोस्ट ऑफिस मध्ये टर्म डिपॉझिट करणे हा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण याबाबत तज्ञ लोकांनी दिलेल्या सविस्तर माहिती विषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

SBI FD आणि पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिटचे व्याजदर

खरे तर एसबीआय मध्ये केलेली एफडी आणि पोस्ट ऑफिस मध्ये केलेले टर्म डिपॉझिट हे पूर्णपणे सुरक्षित आहे. येथे गुंतवलेला पैसा हा कदापी वाया जाणार नाही. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी जर गुंतवणूकदार गुंतवणूक करू इच्छित असेल तर दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे.

तथापि या दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीत मूलभूत फरक आहेत ते फरक आता आपण फक्त जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे एसबीआय ने नुकतेच एफ डी वरील व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे. एसबीआयमध्ये सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी केली जाऊ शकते.

मात्र वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे दर बँकेच्या माध्यमातून लागू होतात. तथापि, या वेगवेगळ्या कालावधीसाठी साडेतीन टक्क्यांपासून ते सात टक्क्यांपर्यंतचे व्याजदर बँकेकडून दिले जाते. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 बेसिस पॉईंट एक्स्ट्रा व्याजदर बँकेकडून दिले जात आहे.

तसेच पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट प्लॅन बाबत बोलायचं झालं तर येथे मिळणारे व्याजदर देखील एसबीआयच्या एफडी समान आहेत. मात्र एसबीआय मध्ये तुम्हाला सात दिवसांपासून ते दहा वर्षापर्यंत एफडी करता येते. पोस्ट ऑफिसच्या या टर्म डिपॉझिट प्लॅनमध्ये मात्र तुम्हाला एका वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंतच गुंतवणूक करता येऊ शकते.

यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीनुसार तुम्हाला कोणती गुंतवणूक स्कीम अधिक योग्य ठरेल यानुसार गुंतवणूक करू शकता. दरम्यान पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट प्लॅनच्या व्याजदराबाबत बोलायचं झालं तर आता पोस्ट ऑफिसमधील एका वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर ६.९% व्याज आणि दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७% व्याज मिळेल. तर तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या मुदत ठेव योजना अनुक्रमे 7.1% आणि 7.5% दर देतात. हे दर १ जानेवारी २०२४ पासून लागू आहेत.

Ahmednagarlive24 Office