आर्थिक

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात! केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांच्या पगारा इतका दिवाळी बोनस, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

सध्या दिवाळी सण तोंडावर आला असून या सणाच्या तयारीची लगबग आपल्याला सर्वीकडे सुरू असल्याचे दिसून येत आहे.परंतु राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून  दिवाळीचे महत्त्व हे वेगळ्या कारणामुळे खूप महत्त्वाचे असते. कारण या कालावधीत सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो  हाच बोनस जाहीर होण्याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत असतात

तसेच बोनस सोबतच कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भेट वस्तू देखील देण्यात येतात. त्यामुळे दिवाळी सणाचे महत्त्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप वेगळे असते.

याच अनुषंगाने जर बघितले तर रेल्वे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून या कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून रेल्वे विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठे बोनस जाहीर केले असून त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 78 दिवसाच्या पगार इतका बोनस जाहीर

केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 78 दिवसांच्या पगारा इतका बोनस जाहीर करण्यात आला असून साधारणपणे दोन महिन्याच्या पगाराच्या जास्तीचा बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

यासंबंधी केंद्र सरकारची नुकतीच एक विशेष बैठक पार पडली व या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा फायदा देशातील एकूण 11.72 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे.

 रेल्वेतील कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा बोनस?

रेल्वे विभागामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार असून यामध्ये ट्रॅक मेंटेनर्स, ट्रेन मॅनेजर्स(गार्ड्स), लोको पायलट, स्टेशन मास्तर,  सुपरवायझर्स, टेक्निशियन हेल्पर, पॉईंट्समन तसेच मिनीस्टेरियल स्टाफ इत्यादी कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे.

साधारणपणे पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना दसरा किंवा नवरात्र उत्सव या सणांच्या मुहूर्तावर बोनसचे वितरण केले जाते. सरकारने यावेळी मात्र केलेल्या घोषणेनुसार 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना मिळणार असून जास्तीत जास्त 17 हजार 951 रुपये बोनस या माध्यमातून दिला जाण्याची शक्यता आहे.

Ajay Patil