Investment In Sip:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक पर्याय सध्या उपलब्ध असून गुंतवणूकदार पसंतीनुसार गुंतवणुकीसाठी पर्यायाची निवड करतात. परंतु अशा पर्यायांची निवड करताना यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतील मिळणारा परतावा आणि गुंतवणुकीची सुरक्षितता या गोष्टींना प्राधान्य प्रामुख्याने दिले जाते.
गुंतवणुकीसाठी बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना तसेच काही सरकारी योजनांचा लाभ बरेच जण घेतात. तसेच शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड एसआयपी हे पर्याय देखील गुंतवणुकीसाठी बरेच जण वापरतात.
कारण तुम्ही जर चांगल्या गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक केली व त्यामध्ये सातत्य ठेवले तर कमी कालावधीत श्रीमंत होता येते. अगदी थोडी थोडी गुंतवणूक करून देखील तुम्ही कमी वेळेत कोटी रुपयांचा फंड जमा करू शकता.
तुम्हाला जर चांगली संपत्ती तयार करायची असेल तर शिस्त आणि संयम ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे असते. या पद्धतीने जर तुम्हाला चांगला पैसा मिळवायचा असेल किंवा गुंतवणुकीतून परतावा हवा असेल तर तुमच्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे. त्या अनुषंगाने आपण एसआयपी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
एसआयपी म्हणजे नेमके काय?
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी एक महत्वपूर्ण गुंतवणूक योजना असून या माध्यमातून तुम्ही शेअर्समध्ये अप्रत्यक्षरीत्या गुंतवणूक करत असतात. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून सोन्यासारख्या कमोडिटी मध्ये गुंतवणूक करू शकतात.
यामध्ये विविध मालमत्तांची व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या विविध प्रकारच्या एसआयपीचा पर्याय गुंतवणूकदारांसाठी प्रदान करतात. त्यामधून तुम्ही तुम्हाला आवडेल तो पर्याय निवडू शकता व तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि परताव्याचा अंदाजाची आखणी करून एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.
जर आपण एसआयपी मधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा पाहिला तर तो अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त देखील परतावा मिळू शकतो किंवा अपेक्षेपेक्षा कमी देखील परतावा मिळू शकतो.
साधारणपणे जर आपण पंधरा टक्के परतावा मिळेल असे जरी गृहीत धरले व यानुसार जर तुम्ही दहा हजार रुपयांची प्रत्येक महिन्याला एसआयपी गुंतवणूक केली व 15 टक्केचा रिटर्नवर तुम्हाला दहा वर्षात 27.86 लाख,
पंधरा वर्षात 67.68 लाख आणि वीस वर्षात एक कोटी 52 लाख रुपये मिळू शकतात. म्हणजेच तुम्ही दहा हजार रुपये प्रति महिन्याला गुंतवून देखील 17 ते 18 वर्षात करोडपती होऊ शकतात.
समजा 20 हजार रुपयांची प्रतिमहिना गुंतवणूक केली तर किती मिळेल परतावा?
समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांना ऐवजी 20 हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करायला सुरुवात केली व व्याज 15% मिळेल असे गृहीत धरले तर तुम्ही 13 ते 14 वर्षांमध्ये कोटी रुपयांचा निधी जमा करू शकतात.
समजा तुम्ही दहा वर्ष प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये गुंतवले व 15 टक्के व्याजदर मिळाला तर दहा वर्षात तुम्हाला 55.73 लाख, पंधरा वर्षात एक कोटी छत्तीस लाख रुपये आणि वीस वर्षात तीन कोटी तीन लाख रुपये तुम्ही मिळवू शकतात
व वीस वर्ष ऐव ऐवजी ही मुदत पाच वर्षांनी वाढवून तुम्ही पंचवीस वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.05 कोटी रुपये मिळू शकतात.
एसआयपीत गुंतवणूक केल्यावर चक्रवाढ व्याजामुळे मिळतो इतका परतावा
एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यावर जो काही मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो त्याचे रहस्य चक्रवाढ व्याजामध्ये दडलेले आहे. म्हणजे तुम्ही एसआयपीमध्ये जी काही गुंतवणूक करतात त्यामध्ये तुमची मुद्दल तर वाढतच जाते आणि त्यामध्ये परतावा देखील जोडला जात असतो.