आर्थिक

Saving Scheme Rule: तुम्हीही ‘या’ बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे का? तर 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम! नाहीतर होईल नुकसान

Published by
Ajay Patil

Saving Scheme Rule:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर पीपीएफ अर्थातच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना, मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे असलेली सुकन्या समृद्धी योजना तसेच नॅशनल पेन्शन स्कीम यासारख्या सरकारी योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते.

ह्या लहान बचत योजना असून यामध्ये गुंतवणूक करणे आर्थिक दृष्ट्या देखील फायद्याचे आहे. या योजना सरकारी योजना असल्यामुळे या योजनेच्या व्याजदरापासून तर अनेक नियमांमध्ये सरकारच्या माध्यमातून प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये काही बदल केले जातात.

त्यामुळे तुम्ही जर या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा केली असेल तर तुम्हाला ते नियम पाळणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला दंड किंवा इतर नुकसान होण्याची शक्यता संभवते.

वर सांगितलेल्या योजनांमध्ये जर तुम्ही देखील गुंतवणूक केली असेल तर 31 मार्च पर्यंत काही महत्त्वाचे कामे करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघू.

 31 मार्चपर्यंत करा हे काम

 तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ, राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएस आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल तर या योजनेच्या खात्यामध्ये पैसा जमा करणे खूप गरजेचे आहे.

म्हणजेच तुम्ही अजूनही खात्यात पैसे जमा केले नसतील तर तुमचे नुकसान होऊ शकते. 31 मार्च 2024 पर्यंत तुमच्याकडे खाते सुरू ठेवण्यासाठी वेळ असून तुम्ही किमान वार्षिक ठेव ठेवल्यास तुमचे खाते गोठवले जाऊ शकते व तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो.

म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे या योजनांमध्ये किमान ठेव ठेवण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी नियम 2019 नुसार विचार केला तर या योजनेच्या म्हणजेच पीपीएफ योजनेच्या खातेधारकांना प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपये जमा करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही खात्यामध्ये 31 मार्च 2024 पर्यंत ही किमान रक्कम जमा केली नाही तर तुमचे खाते बंद केले जाणार आहे. जर पीपीएफ खाते बंद झाले तर कर्ज आणि अंशिक पैसे काढण्याची सुविधा सुरू होणार नाही व खाते पूर्णपणे बंद केल्याशिवाय तुम्ही तुमच्या नावावर दुसरे खाते उघडू शकणार नाहीत.

तुम्हाला बंद झालेले पीपीएफ खाते पुन्हा सुरू करता येते पण याकरिता तुम्हाला दरवर्षी पन्नास रुपये दंड भरावा लागतो व यासोबत किमान वार्षिक ठेव म्हणून पाचशे रुपये देखील जमा करणे गरजेचे असते. अशा प्रकारचे खाते बंद झाल्यास तुम्हाला ते पुन्हा सुरू करण्यासाठी दरवर्षी साडेपाचशे रुपये द्यावे लागतात.

 सुकन्या समृद्धी योजनेमध्ये

 सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर तुमच्या मुलीचे खाते असेल तर या खात्यामध्ये दरवर्षी किमान 250 रुपये जमा करणे गरजेचे असते. जर तुम्ही ते जमा केले नसतील

तर 31 मार्च 2024 पूर्वी ते जमा करणे गरजेचे आहे. नाहीतर ते खाते डिफॉल्ट मानले जाईल व पुन्हा ते सुरू करण्यासाठी वर्षाला पन्नास रुपये दंड तुम्हाला भरावा लागेल व दरवर्षी किमान 250 रुपये जमा करावे लागतील.

 पीपीएफ सुकन्या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर मिळेल कर वाचवण्याची संधी

 या आर्थिक वर्ष मध्ये तुम्हाला जुन्या करप्रणालीमध्ये कर भरायचा असेल तर पीपीएफ आणि सुकन्या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकतात. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत पीपीएफ आणि सुकन्या मधील गुंतवणुकीवर दीड लाख रुपयांपर्यंतची कर सवलत अर्थात वजावट उपलब्ध असते.

या अंतर्गत जर तुम्हाला कर कपातीचा फायदा घ्यायचा असेल तर 31 मार्च 2024 पर्यंत या योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

म्हणजेच प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता कर बचत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. या तारखेपर्यंत जर तुम्ही गुंतवणूक केली नाही तर या आर्थिक वर्षात तुम्ही कर कपातीचा दावा करू शकणार नाहीत.

 त्यामुळे या योजनांविषयी वर सांगितलेली महत्त्वाची कामे तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत करून घेणे गरजेचे आहे.

Ajay Patil