आर्थिक

नोकरी करून पगार मिळवा व त्यासोबत या’ पर्यायांचा वापर करून पगारापेक्षा जास्त पैसे मिळवा! वाचा संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्याने जर आपल्या घरात एकच व्यक्ती कमावती असेल किंवा एकच मार्गाने पैसा येत असेल तर बऱ्याचदा तो पैसा आपल्याला पुरत नाही किंवा आपण दैनंदिन गरजा भागवून पैशांची बचत करू शकत नाही. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती नोकरी करताना काही एक्स्ट्रा कमाई साठी वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेत असतात.

कारण या जगात पैसे कमावणे देखील तितकेच महत्त्वाचे असते व पैसे कमवायचे असतील तर अगोदर आपल्याला पैशांचे नियोजन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. तुम्ही किती पैसा कमावता त्यापेक्षा जो कमावता त्याची बचत कशी करता व त्याची गुंतवणूक कोणत्या ठिकाणी करता हे देखील महत्त्वाचे असते.

समजा तुम्ही कुठेतरी नोकरी करत आहात व नोकरी करता करता तुम्हाला अजून जास्त पैसे मिळवायचे आहेत तर तुम्ही तुमच्याकडे असलेला पैसा लावून पैशांनी पैसा कमवू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने पैसा कसा कमावता येतो किंवा त्याकरिता कोणते पर्याय फायदेशीर ठरतात? याबद्दलची माहिती बघू.

 नोकरी करताना हे पर्याय वापरा आणि जास्तीचे पैसे मिळवा

1- एखाद्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करा सध्याच नवनवीन स्टार्टअप सुरू केले जात असून या नवीन स्टार्टअप सुरू करणारे व्यक्ती हे गुंतवणूकदारांचा कायम शोध घेत असतात. अशावेळी तुम्ही जर नोकरी करत असाल व तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही एखाद्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून चांगला पैसा मिळवू शकतात.

यासाठी तुम्हाला फक्त कोणत्या लोकांनी नवीन स्टार्टअप सुरू केले आहे त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे व त्यांना जर गुंतवणुकीची आवश्यकता असेल तर तुम्ही त्यांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामुळे तुम्ही नोकरी करता करता देखील केलेल्या गुंतवणुकीतून त्या स्टार्टअप च्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.

2- कर्ज देऊन व्याजातून पैसा मिळवणे आजकाल बऱ्याच लोकांना अचानकपणे पैशांची गरज पडते. तेव्हा तुम्ही अशा पैशांची गरज असलेल्या लोकांना कर्ज स्वरूपात पैसा देऊन त्यातून मिळणाऱ्या व्याजातून चांगला पैसा मिळवू शकता. परंतु याकरिता तुम्ही कायदेशीर नियम पाळणे खूप गरजेचे आहे.

जर समोरचा व्यक्ती वेळेत पैसा परत करेल अशी गॅरंटी तुम्हाला असेल तर तुम्ही कर्ज स्वरूपात समोरच्याला मदत करून त्यावर व्याज मिळवून चांगला पैसा मिळवू शकतात. एखाद्या बँकेत एफडी करण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही पैसे देऊन व्याजातून चांगला पैसा मिळवू शकता.

एफडी केली तर तुम्हाला वार्षिक सात ते आठ टक्के दराने व्याज मिळेल परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही कर्ज दिले तर कमीत कमी 13 ते 15 टक्के वार्षिक व्याज मिळवू  शकतात.परंतु यामध्ये परवाना वगैरे ज्या कायदेशीर गोष्टी असतील त्या पूर्ण करूनच या पद्धतीने पैसे देणे फायदेशीर ठरते.

3- शेअर मार्केट मधील गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हा  पैसे कमवण्याचा चांगला मार्ग आहे. परंतु याकरिता तुम्हाला सखोल अभ्यासाची गरज असून  अशा प्रकारचा अभ्यास करूनच तुम्ही चांगल्या परतावा देऊ शकतील अशा शेअर्सची निवड करू शकतात व त्यातून चांगला पैसा मिळू शकतात.

तुम्ही म्युच्युअल फंडाचा मार्ग देखील अवलंबू शकता व यावर तुम्हाला सरासरी 12 ते 13 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो. परंतु यामध्ये देखील तुम्ही गुंतवणूक तज्ञाचा  सल्ला घेऊन आणि स्वत या गोष्टींचा सखोल अभ्यास करून यात सुरुवात केली तर फायदा होऊ शकतो.

Ajay Patil