आर्थिक

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळवा 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान! ‘अशा पद्धती’ने करावा लागेल अर्ज

Published by
Ajay Patil

शेती आणि शेती क्षेत्राचा विकास व्हावा याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो. शेती सोबतच शेतीशी प्रमुख असलेला जोडधंदांच्या बाबतीत देखील अनेक योजना राबविण्यात येत असून जोडधंद्यांच्या  विकासाकरिता देखील शासनाच्या अनेक योजना आहेत.

या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना आर्थिक मदत देण्यात येते. या पद्धतीने जर आपण पशुपालनासाठी महत्त्वाचे असलेली एक योजना पाहिली तर ती म्हणजे गाय गोठा बांधण्यासाठी सरकारकडून जी अनुदान योजना राबवण्यात येते ती देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या योजनेच्या माध्यमातून एक लाख साठ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.

 काय आहे या योजनेचे स्वरूप?

1- समजा पशुपालकांकडे जर तीन जनावरे आहेत तर त्यांना पशुशेड बांधण्यासाठी शासनाकडून 75 ते 80 हजार रुपये अनुदान मिळते.

2- जर एखाद्या पशुपालकाकडे जर जनावरांची संख्या तीन पेक्षा जास्त असेल तर या योजनेच्या माध्यमातून शेड उभारण्यासाठी सरकार एक लाख 16 हजार रुपयांची आर्थिक मदत करते.

3- तुमच्याकडे गाई आणि म्हशींची संख्या जास्त असल्यास सरकारकडून एक लाख साठ हजार रुपये अनुदान दिले जाते.

 गाय गोठा योजनेकरिता अर्ज कसा करावा लागतो?

1- गाय गोठा योजनेसाठी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत ठराव मध्ये नाव समाविष्ट करणे गरजेचे असते.

2- त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज नमुना येथे उपलब्ध आहे तो डाउनलोड करून घ्यावा.

3- त्यानंतर गोठ्याचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये जमा करावा लागतो.

4- गाय गोठा चा प्रस्ताव जमा केल्यानंतर आपल्या अर्जास मंजुरी दिली जाते.

5- त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी गोठा बांधायचा आहे त्या जागेचे जिओ टॅगिंग करावे लागते.

6- जिओ टॅगिंग झाल्यानंतर आपल्याला वर्क ऑर्डर दिली जाते.

 गाय गोठा योजनेत असलेल्या पीडीएफ मध्ये खालील माहिती भरावी लागते

1- अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचा आहे.

2- जर लाभार्थ्याच्या नावे जमीन असेल तर हो लिहावे लागते व सातबारा तसेच आठ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे. तसेच लाभार्थ्याला गावचा रहिवासी पुरावा जोडायचा आहे.

3- तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.

4- त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे व त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीचे एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे व त्यामध्ये लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.

5- त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांच्या छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीचे अधिकाऱ्यांच्या सही शिक्यानुसार  पोचपावती दिली जाते.

Ajay Patil