आर्थिक

15 मिनिटात बँक ऑफ बडोदा देईल तुम्हाला 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन; कशी आहे प्रक्रिया व कोणते लागतात कागदपत्रे? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

आपत्कालीन आर्थिक समस्या जेव्हा उद्धवते तेव्हा आपल्याला पैशांची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने हॉस्पिटलचा खर्च किंवा घरात लग्नकार्य किंवा इतर कारणांमुळे अचानकपणे आपल्याला पैसे लागू शकतात. अशा परिस्थितीत लागणारा पैसा आपल्याकडे असतो असे नसतेच त्यामुळे बरेच जण कर्जाचा पर्याय निवडतात.

यामध्ये प्रामुख्याने मित्र किंवा नातेवाईक तसेच बँकांचा दरवाजा ठोठावला जातो. यामध्ये बँकेकडून जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याला एक विशिष्ट अशी प्रक्रिया असते व ती पूर्ण करूनच आपल्याला कर्ज मिळते.

बँकेकडून प्रामुख्याने पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य दिले जाते. विविध बँकांकडून आता आकर्षक व्याजदरावर पर्सनल लोन दिले जाते व यामध्ये बँक ऑफ बडोदा हे एक विश्वसनिय असे नाव असून  या बँकेच्या माध्यमातून देखील ग्राहकांना पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक लोनची सुविधा पुरवली जाते.

 कशी आहे बँक ऑफ बडोदाची वैयक्तिक कर्ज योजना?

बँक ऑफ बडोदाच्या वैयक्तिक कर्ज योजना अंतर्गत तुम्हाला कमाल दहा लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन मिळू शकते. विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हाला सहजासहजी व कमी वेळेमध्ये उपलब्ध होते. तुम्हाला जितकी कर्जाची गरज आहे तितकी तुम्ही कर्जाची रक्कम ठरवू शकतात.

बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्जावर वार्षिक दहा टक्के व्याज आकारले जाते व कर्जाकरिता दोन टक्क्यांचे प्रक्रिया शुल्क देखील भरणे गरजेचे असते. या कर्जाचा जर परतफेडीचा कालावधी बघितला तर तो पाच वर्षांचा आहे.

परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झाली तर तुम्ही संपूर्ण कर्जाची परतफेड मुदती आधी देखील करू शकतात.बँकेच्या माध्यमातून यावर कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारली जात नाही.

 काय आहेत बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन घेण्यासाठीच्या अटी?

बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदाराचे वय 31 ते साठ वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराकडे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत असणे देखील आवश्यक आहे.जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर बँकेबद्दल तुमचे खाते किमान एक वर्ष जुने असणे गरजेचे आहे.

 बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला बँक खाते स्टेटमेंट, सॅलरी स्लिप किंवा उत्पन्नाचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि मतदार ओळखपत्र आवश्यक असते.

 बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन साठी अर्ज करण्याच्या पद्धती

बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन साठी अर्ज करताना तो ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो. ऑफलाइन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या जवळच्या ब्रांचला भेट द्यावी लागते व फॉर्म क्रमांक 16 भरावा लागतो. त्यानंतर विचारलेली आवश्यक कागदपत्रे सबमिट करावे लागतात.

तसेच ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन पर्सनललोन करीता अर्ज करू शकतात. यामध्ये तुमची पर्सनल माहिती आणि काही कागदपत्रे अपलोड करावे लागतात व नंतर बँकेच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधला जातो. त्यानंतर तुमची पात्रता तपासले जाते व पात्रतेनुसार कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

Ajay Patil