आर्थिक

250 रुपयात बनवेल ‘ही’ योजना तुम्हाला लखपती! वाचा कसा होईल या योजनेत गुंतवणूक केल्यावर फायदा?

Published by
Ajay Patil

गुंतवणुकीसाठी अनेक वेगवेगळे पर्याय सध्या उपलब्ध असून गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार पैशांची गुंतवणूक करत असतात. कारण चांगला व्याजदर आणि सुरक्षित परताव्याचे हमी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते.

गुंतवणूक पर्यायामध्ये अनेक बँकांच्या मुदत ठेव योजनांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते व त्यासोबतच सरकारच्या अल्पबचत योजना व पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या गुंतवणुकीसाठी खूप फायद्याचे आहेत. अशीच एक पोस्ट ऑफिसची योजना असून ती गुंतवणुकीसाठी खूप फायद्याची आहे.

योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना होय. तुम्हाला जर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही योजना खूप चांगल्या प्रकारे परतावा देऊ शकते. दररोज तुम्ही 250 रुपयांची बचत केली तरी तुम्हाला या योजनेत 24 लाख रुपये जमा करणे शक्य होते.

 पीपीएफ योजनेत मिळते 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज

पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ही एक आकर्षक स्वरूपामध्ये व्याज देणारी योजना असून या योजनेत  केलेल्या गुंतवणुकीचे हमी खुद्द सरकारच्या माध्यमातून देण्यात येते.

या योजनेत गुंतवणूक केल्यावर 7.1% दराने व्याज मिळते व टॅक्समध्ये देखील तुम्हाला सवलत मिळते. तुम्ही प्रत्येक वर्षी जी गुंतवणूक कराल ती तुम्हाला टॅक्स फ्री असणार आहे. तसेच गुंतवणूकदारांना व्याजावर टॅक्स सवलत मिळतेच परंतु मॅच्युरिटीवर जो काही पैसा मिळतो त्यावर देखील टॅक्स द्यावा लागत नाही.

 दररोज 250 रुपयांची गुंतवणूक देईल तुम्हाला 24 लाख रुपये

या योजनेमध्ये जर तुम्ही 250 रुपयांची गुंतवणूक केली तर 24 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला दररोज 250 रुपयाची बचत करणे गरजेचे आहे व महिन्याला तुम्ही साडेसात हजार रुपये जमा करतात व साधारणपणे वर्षाला ही रक्कम 90 हजार रुपये होते.

ही रक्कम जर तुम्ही पंधरा वर्षापर्यंत पीपीएफ योजनेमध्ये गुंतवली तर प्रत्येक वर्षाला 90 हजार रुपये म्हणजेच पंधरा वर्षात 13 लाख 50 हजार रुपये जमा होतात. या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1% दराने व्याज मिळते.

व्याजाची एकूण रक्कम दहा लाख 90 हजार 926 रुपये होते. म्हणजेच व्याज आणि मुद्दल मिळून तुम्हाला मॅच्युरिटी वर एकूण 24 लाख 40 हजार 926 रुपये मिळतात. फक्त यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करणे गरजेचे असून त्यात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे.

Ajay Patil