आर्थिक

Government Business Loan Scheme: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळते 3 लाखांचे कर्ज! वाचा योजनेची माहिती

Published by
Ajay Patil

Government Business Loan Scheme:- समाजातील विविध घटकांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यांचे जीवनमान उंचवावे याकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

अशा योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट कर्ज स्वरूपात मदत करण्यात येते. यामध्ये बऱ्याच योजना या व्यवसाय उभारणीकरिता कर्ज स्वरूपात मदत करतात. कारण कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे त्याकरिता भांडवलाची आवश्यकता असते किंवा आहे तो व्यवसाय वाढवण्यासाठी देखील पैसा लागतो.

त्यामुळे अशा व्यवसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी देखील या योजना आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात.

अगदी या अनुषंगाने जर आपण केंद्र सरकारच्या एका योजनेचा विचार केला तर ती योजना व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप महत्वाच्या असून या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कुठल्याही गॅरंटी किंवा तारणाशिवाय तीन लाखापर्यंत आर्थिक मदत कर्ज स्वरूपात मिळते.

 पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला मिळेल गॅरंटीविना तीन लाखापर्यंत कर्ज

 तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तीन लाखाची आर्थिक मदत मिळवू शकतात व तुमच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवू शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहन दिले जाते.

या माध्यमातून आर्थिक मदत मिळवण्याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटी देण्याची गरज भासत नाही. तीन लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला या माध्यमातून मिळते. साधारणपणे या योजनेच्या माध्यमातून दोन टप्प्यांमध्ये तुम्हाला कर्ज दिले जाते.

यातील पहिल्या टप्प्यात  व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते व त्यानंतर व्यवसायाची वाढ करण्याकरिता दोन लाख रुपयांचे कर्ज दिले जाते व हे घेताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटी देण्याची गरज राहत नाही.

मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये म्हणजेच सप्टेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना लॉन्च करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे या अंतर्गत तुम्हाला कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था देखील सरकारच्या माध्यमातून केली जाते

व या प्रशिक्षणा दरम्यान स्टायपेंडची देखील व्यवस्था करण्यात येते. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 18 ट्रेड मधील काम करणाऱ्या लोकांना कर्ज मिळू शकते. जर आपण प्रशिक्षणाचा विचार केला तर ते मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून दिले जाते व पाचशे रुपयांचा स्टायपेंड देखील मिळतो.

 पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

1- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2- अर्जदाराचे वय किमान 18 पेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

3- योजनेचा लाभार्थी हा 18 ट्रेड मधील व्यवसाय करणारा किंवा व्यवसाय उभारणारा असायला हवा.

4- तसेच या योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांना मान्यताप्राप्त संस्थेच्या ट्रेडचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

5- तसेच अर्जदार हा यामध्ये नमूद केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र

 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार आणि पॅन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा पद्धतीने करा अर्ज

1- तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम pmvishwakarma.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

2- त्यानंतर आपल्या ऑनलाइन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करणे गरजेचे आहे व त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या फोनवर पाठवला जाईल.

4- त्यानंतर तुम्ही आवश्यक तो फॉर्म भरायचा आहे व आवश्यक कागदपत्र अपलोड करून तो फॉर्म सबमिट करायचा आहे.

Ajay Patil