Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक योजना सध्या असून प्रत्येक योजनांचे वैशिष्ट्य आणि व्याजदर वेगवेगळे असतात. या प्रकारच्या कुठल्याही योजनेमध्ये कुठलाही गुंतवणूकदार जेव्हा गुंतवणूक करतो
तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात अगोदर असते ते म्हणजे करत असलेल्या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा. या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी त्याला योग्य वाटतात त्याच ठिकाणी गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात.
यामध्ये प्रामुख्याने बरेच व्यक्ती बँकांच्या मुदत ठेव योजना यांना प्राधान्य देतात तर काही सरकारी योजना देखील यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये जर आपण पोस्ट ऑफिसच्या योजनांचा विचार केला तर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चांगला परतावा देणारे योजना राबवल्या जात असून
यामध्ये तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवू शकतात. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये पोस्ट ऑफिसच्या अशाच एका महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्या योजनेत गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे.
पोस्टाची ग्रामसुरक्षा योजना आहे फायद्याची
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक महत्त्वाची आणि फायद्याची योजना राबवली जात असून त्या योजनेचे नाव आहे ग्रामसुरक्षा योजना हे होय. या योजनेमध्ये तुम्ही दररोज पन्नास रुपये जमा करून एकदा 35 लाख रुपयांचा फंड किंवा नफा मिळू शकतात.
ही योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असून ग्रामसुरक्षा योजना ही ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचा एक भाग आहे. साधारणपणे 1995 मध्ये ग्रामीण भागातील लोकांसाठी ही विमा पॉलिसी सुरू करण्यात आलेली होती.
एकोणावीस ते 55 वर्षे वयोगटातील कोणतेही भारतीय व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. या योजनेमध्ये तुम्ही दहा हजार रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.समजा तुम्ही दररोज पन्नास रुपये म्हणजेच महिन्याला जर 1515 रुपये गुंतवले तर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळवू शकणार आहात.
याकरिता तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करणे सुरू करावे व 55 वर्षापर्यंत या योजनेत तुम्हाला 1511 रुपये एवढा प्रीमियम दर महिन्याला भरावा लागेल. यामध्ये 55 वर्षाच्या गुंतवणुकीवर संबंधित गुंतवणूकदाराला 31.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.
काय आहेत ग्राम सुरक्षा योजनेचे महत्त्वाचे नियम?
1- ही योजना 19 ते 55 वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी आहे.
2- या योजनेची किमान विमा रक्कम दहा हजार ते दहा लाख रुपयापर्यंत आहे.
3- या योजनेमध्ये तुम्ही मासिक, त्रैमासिक तसेच सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.
4- प्रीमियम भरण्याकरिता तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी दिला जातो.
5- योजनेच्या माध्यमातून तुम्ही कर्ज देखील घेऊ शकतात.